पुणे : डॉक्टरच्या मृत्यूची पोस्ट फेक; कुटुंबियांचे स्पष्टीकरण | पुढारी

पुणे : डॉक्टरच्या मृत्यूची पोस्ट फेक; कुटुंबियांचे स्पष्टीकरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा

डॉ. मेघा व्यास या डॉक्टर असून त्यांचे कोरोनाच्या रुग्णांची सेवा करताना निधन झाले असल्याची पोस्ट व्हॉट्सॲप आणि फेसबुक या समाजमाध्यमावर व्हायरल होत आहे. मात्र ही फेक न्यूज असून अशी पोस्ट पसारविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

वाचा :  पुणे : ‘तुमच्या कर्तव्याची तुलना युद्धभूमीशीच’ (video)

मेघा शर्मा असे या महिलेचे नाव असून दोन दिवसांपूर्वी त्यांचे जहांगीर रुग्णालयात न्यूमोनिया व इतर आजाराने निधन झाले आहे. त्यांचे पती श्रीकांत शर्मा असून ते डॉक्टर आहेत आणि ते पुण्यात राहतात. याबाबत दैनिक पुढारीशी बोलताना डॉ. शर्मा म्हणाले की, मेघा व्यास नावाने जो फोटो फॉरवर्ड जात आहे. तो माझ्या पत्नीचा आहे. मुळात त्या डॉक्टर नसून कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याची चुकीची अफवा पसरवली जात आहे. मेघा यांचा मृत्यू इतर कारणामुळे झाला असून, तसा रिपोर्ट जहांगीर हॉस्पिटलने दिला आहे. याबाबत काही पोलिसांकडे मी अजून तक्रार केलेली नाही. मला सहा वर्षाचा मुलगाही आहे. आणि असा संदेश व्हायरल होत असल्याने मला मानसिक त्रास झाला आहे. कृपया कोणीही असा संदेश पुढे पाठवू नये अन्यथा पोलिसांकडे त्याची तक्रार केली जाईल, असे ते म्हणाले.

वाचा :तब्बल १५ हजार पुणेकरांवर गुन्हे; तरीही कोरोना संकटाचे गांभिर्य नाही

Back to top button