मालेगावात दिवसभरात वाढले कोरोनाचे २८ रुग्ण | पुढारी

मालेगावात दिवसभरात वाढले कोरोनाचे २८ रुग्ण

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

मालेगावमध्ये शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे नवीन २८ रुग्ण वाढले. त्यासोबतच एकट्या शहर व तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या ४५९ झाली आहे. शहरात निर्माण झालेली आव्हानात्मक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा व महापालिका प्रशासनाने आगामी सज्जता चाचपणी सुरू केली आहे. प्रसंगी नवीन हॉस्पिटल उभारणीसह अधिग्रहणाचे पर्याय इमर्जन्सी सेंटरसाठी खुले ठेवण्यात आले आहेत.

प्रशासकीय पातळीवर हालचाली गतीमान दिसत असल्या तरी लोकांच्या प्रतिसादाअभावी अपेक्षित परिणाम हाती लागलेले नाहीत. त्याचमुळे दिवसागणिक दशकस्थानी रुग्ण वाढ कायम आहे. शुक्रवारी सकाळी २१, नंतर एक व सायंकाळी सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मनपा क्षेत्रात ४४८, तर दाभाडीसह ग्रामीण भागात ११ रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी नवीन ४० रुग्ण उपचारार्थ दाखल झाले. अजुनही ४९४ संशयितांचे स्वॅब चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.

Back to top button