मुंबईत दोन डॉक्टरांचा मृत्यू | पुढारी | पुढारी

मुंबईत दोन डॉक्टरांचा मृत्यू | पुढारी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डॉक्टर्स आणि परिचारिकांसह अनेक कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे.शुक्रवारी दोन डॉक्टर्सना प्राण गमवावा लागला. त्यामुळे कोरोनाशी लढताना आतापर्यंत 5 डॉक्टरांचा बळी गेला आहे.दुर्दैैवाची बाब म्हणजे यातील एका डॉक्टरचा मृत्यू आयसीयू बेड न मिळाल्यामुळे झाल्याचे सांगण्यात आले. 

शुक्रवारी मुंबईतील सायन रुग्णालय आणि सोमैय्या रुग्णालयात 2 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामधील एक डॉक्टर चिंता कॅम्प, ट्रॉम्बे येथील जनरल फिजिशियन तर दुसरा अंधेरी पूर्वेकडील आयुर्वेदिक असल्याचे समजते. 

संबंधित बातम्या

ट्रॉम्बे येथील 51 वर्षीय डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना 24 मे रोजी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रतीक्षा यादीत 41 वा नंबर असलेल्या या डॉक्टरचा 26 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अद्याप रुग्णाच्या मृत्यूबदल माहिती मिळली नसल्याचे सांगत. मात्र महापालिका रुग्णालयातील कोणत्याही डॉक्टरांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली. मृत्यू नेमका कशाने झाला याची माहिती घेण्यात येत असल्याचे महापालिका रुग्णालयांचे प्रमुख डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

 अंधेरी पूर्व येथील एका आयुर्वेदिक डॉक्टरचा कोरोनाची लागण झाल्यानं मृत्यू झाला आहे. गुरूवारी दुपारी सौमेय्या रुग्णालयात ही घटना घडली. सायन रुग्णालयात आयसीयू बेड्सच्या कमतरतेमुळे सुरुवातीला त्यांना कॅज्युअल्टीमध्ये पाठवून वेटिंग नंबर देण्यात आला आणि 26 मे रोजी त्यांचे निधन झाल्याचे समजते. त्यांना शताब्दी रुग्णालयातही आयसीयू बेड उपलब्ध झाला नसल्याने त्यांनी त्यांना सायन रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. 

Back to top button