कोरोना आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती | पुढारी

कोरोना आणि स्वयं रोगप्रतिकार शक्ती

डॉ. देवेंद्र रासकर

कोरोना व्हायरस यावरील औषध अजून बनवलं गेलं नाही. जे कोणी कोरोना आजारातून बरे झालेले लोक आहेत, ते केवळ त्यांच्या प्रतिकार शक्ती  (आपल्या शरीरातील स्वयं रोगप्रतिरोधक करणारी ताकत आहे.) वाढल्यानेच बरे झाले आहेत. त्यामुळे ती वाढवायलाच हवी.

बर्‍याच लोकांना असं वाटतं, की हा आजार एक वेळ सर्वांनाच होणार आहे. ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे तो वाचणार आणि ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, तो बळी पडणार! 

याचा अर्थ आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती हेच कोरोनावरील खरे औषध आहे. म्हणूनच आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या प्रतिकार शक्ती वाढविण्याकडे वळवले पाहिजे.  जर आपल्याला या महामारीपासून वाचायचं असेल, तर नक्कीच आपल्याला आता हे शिकावच लागणार आहे, की कशामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढते आणि कशामुळे आपली प्रतिकार शक्ती कमी होते.

संबंधित बातम्या

त्यातच सध्या पावसाळा सुरू आहे. सर्दी, खोकल्याच्या विषाणूंना वाढ होण्यास हा काळ पोषक असतो. डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया हे आजार डासांमार्फत पसरतात. विशेषत: थंडी वाजून येणे, ताप, अंगदुखी तसेच तापाबरोबर सांधेदुखीचीही लक्षणे दिसू शकतात. छातीमध्ये कफ, घशामध्ये खवखव होऊ शकते. 

आपली शरीरयंत्रणा या विषाणूंना प्रतिरोध करण्यासाठी सक्षम असते. परंतु, या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य सांभाळणे खूप आवश्यक असते.

या काळात वैयक्तिक स्वच्छता, पोषक आहार  आणि सामाजिक आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक असते. स्वतःची ऑक्सिजन लेव्हल वाढवणे आवश्यक आहे. गरजेशिवाय मास्क न काढणे, तसेच अधिक श्वासाची गरज असताना मास्क न वापरणे, रक्तदाब, मधुमेह आणि दमा असणार्‍या व्यक्तींनी स्वतःची रोग प्रतिकार शक्ती जास्तीत जास्त वाढवणे आवश्यक आहे.

कोरोना आजाराविषयी सध्यातरी लोकांच्या मनातील भीती कमी झालेली नाही. आपला भारत देश लवकरच कोरोनामुक्त होईल. इतर देशांच्या तुलनेत भारतातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असल्याचे दिसून आले आहे. ही खूप आशादायक बाब आहे.

सद्यस्थितीत प्रशासन, सरकार, डॉक्टर, पत्रकार, सफाई कर्मचारी संपूर्ण परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळत आहेत;  पण नागरिकांनीही स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला हवी.

औषधांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम-30’  हे होमिओपॅथिक औषध अत्यंत प्रभावी ठरले आहे आणि त्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत.  भारतीयांना रुग्ण बरे होण्यासाठी याचा खूप चांगला उपयोग झालेला दिसून येत आहे.

सर्वप्रथम आपण कशामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते, याकडे लक्ष देऊ.

1) योगा  

2) व्यायामाचा कोणताही प्रकार

3) घरी बनवलेलं शुद्ध जेवण 

4) आवळा (कोणत्याही प्रकारे तुम्ही खाऊ शकता)

5) फळे (कोणतेही एक आंबट फळ) 

6) हिरव्या पालेभाज्या 

7) विविध डाळी 

8) सेंद्रिय गूळ 

9) शुद्ध तेल (कोणतेही रिफाईंड तेल नको) 

10) गुळवेल सत्व (गिलोय)

11) तुळस आणि 

12) अन्य आयुर्वेदिक पेय. हळद – दूध, दही, पनीर इत्यादी.

शरीरातील प्रतिकार शक्ती कमी करणारे पदार्थ

1)  मैदा (सर्वात जास्त विषारी पदार्थ कोणत्याही स्वरूपात उदाहरणार्थ ब्रेड, नान, बटर, बर्गर, पिझ्झा, जीलेबी, समोसा, कचोरी, पाव, पावभाजी  हे पदार्थ) अजिबात खाऊ नका. 

2) रिफाईंड तेल (अजिबात खाऊ नका ) 

3) साखर अजिबात नको (आयुर्वेदिक गूळ, आयुर्वेदिक साखर आणि खडीसाखर घेऊ शकता.)

4) बाहेरील कोणतेही जंक फूड खाऊ नका. 

5) मैदा आणि साखरेपासून बनवलेले कोणतेही खाद्य पदार्थ (जसे की बर्गर, पिझ्झा, जिलेबी इत्यादी) खाऊ नका. 

6) अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये बनवलेले पदार्थ खाणं बंद करा. 

7) कोल्ड्रिंकचे सेवन टाळा.

8) पॅकिंगमध्ये असलेले खाद्यपदार्थ (अत्यंत आवश्यकता वाटल्यासच कमी प्रमाणात घेऊ शकता. )

या पद्धतीने आपण आपली जीवनशैली बनवली, तर आपली  रोगप्रतिकार शक्ती अतिशय मजबूत होऊ शकते आणि आपण कोरोनापासून वाचू शकतो. लक्षात ठेवा आपली प्रतिकार शक्ती हेच कोरोनावरील खरे औषध आहे.

Back to top button