पाण्याचा एक थेंब | पुढारी | पुढारी

पाण्याचा एक थेंब | पुढारी

कथा

ए का तरुण मुलाला त्याच्या आई-वडिलांनी एकदा झेन आश्रमात झेन तत्त्वज्ञान शिकण्यासाठी पाठविले. विख्यात झेन गुरू गिसान यांचा तो आश्रम होता. त्या तरुणाचा दिवसातील बराचसा वेळ प्रार्थना करणे व झेन सूत्रांचा अभ्यास करणे यात जायचा. इतर वेळी तो भाताच्या शेतीवर काम करायचा किंवा मंदिरात ध्यान करायचा. एके दिवशी गुरू गिसान यांनी मुलाला आंघोळीसाठी पाणी गरम करण्यास सांगितले. मुलाच्या दुर्लक्षामुळे पाणी फारच गरम झाले व उकळू लागले. गिसानने थोडे थंड पाणी आश्रमाच्या मागील बाजूस असलेल्या विहिरीतून आणून गरम पाण्याच्या भांड्यात ओतण्यास मुलाला सांगितले. मुलाने दोन बादल्या थंड पाणी आणले व त्या भांड्यात तो पाणी ओतू लागला.

गरम पाण्यात बोटे बुडवून गिसान यांनी पाण्याचे तापमान योग्य आहे का ते तपासले. त्यांना ते योग्य वाटल्यावर त्यांनी मुलाला थांबण्याचा इशारा केला. बादलीत थोडे पाणी शिल्‍लक होते. क्षणभरही विचार न करता त्या मुलाने उरलेले पाणी जमिनीवर फेकून दिले.“हे काय केलेस, मूर्खा?” गिसान त्या मुलावर क्रोधीत होत म्हणाले, “हे पाणी तू एखाद्या झाडाच्या मुळाशी किंवा फुलांच्या ताटव्यामध्ये ओतू शकला नसतास? तू पाण्याचा अपव्यय करायला नको होतास.” त्या मुलाच्या डोळ्यांत अश्रू आले. त्याचे गुरू त्याला म्हणाले, “मुला, हे पावसाळ्याचे दिवस नाहीत. पाणी मिळणे फार कठीण झाले आहे. पाण्याचा एक थेंबही मौल्यवान आहे.” त्याक्षणी त्या मुलाला झेन तत्त्वज्ञानाची नवी ओळख झाली. त्याने स्वत:चे नाव बदलून ‘टेकिसुई’ असे ठेवले. या नावाचा अर्थ होतो पाण्याचा एक थेंब. टेकिसुई पुढे फार मोठा झेन गुरू बनला.

संबंधित बातम्या

 

फिरकी गिरकी

सु मारे 30 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या ड्रॅगनफ्लाय या कीटकाचा आकार प्रचंड होता. या कीटकाच्या पंखांचा घेरच सुमारे दोन 
फूट होता.

स र्व संत्री काही नारंगी रंगाची नसतात. विषुववृत्ताच्या आसपासच्या भागात उगवणारी संत्री हिरव्या रंगाची असतात व पूर्ण पिकली तरी हिरव्या रंगाचीच राहतात.

2 017 च्या युरोपिअन भोपळा महोत्सवात मॅथिस विलेमिजन्स या बेल्जिअन शेतकर्‍याच्या भोपळ्याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या भोपळ्याचे वजन चक्‍क सुमारे 1008 किलो भरले. यापूर्वी 2016 मध्येही मॅथिसच्या 1190 किलो वजनी भोपळ्याने प्रथम क्रमांक पटकावून विश्‍वविक्रम केला होता.

चं द्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीचा परिवलनाचा वेग दरवर्षी किंचित मंद होतो. दर शंभर वर्षांत चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमणाने दिवसाच्या कालावधीत 1.7 मिली सेकंदाची वाढ होते. हिशोब केलात तर 35 कोटी वर्षांनंतर पृथ्वीचे एक वर्ष 385 दिवसांचे असेल.
 

Back to top button