लक्ष्मी यादव | पुढारी | पुढारी

लक्ष्मी यादव | पुढारी

छत्तीसगढ राज्यातील रायपूर शहरातील शक्तिनगर येथे राहणार्‍या लक्ष्मी यादव या बालिकेची निवड यावर्षी बालवीरांना देण्यात येणार्‍या राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी झाली आहे. 2 ऑगस्ट 2016 या दिवशी लक्ष्मी यादवचे अपहरण तीन गुंडांकडून झाले होते. त्या तीन अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वत:ला सोडवून त्या बदमाशांना गजाआड पाठविण्याचे साहस तिने दाखविले.

त्यादिवशी लक्ष्मी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतत असताना तीन गुंड मोटारसायकलवरून आले. तिच्याच विभागात राहणारे हे गुंड अपहरणाच्या अनेक कृत्यांत सहभागी होते. लक्ष्मीला त्यांनी जबरदस्तीने मोटारसायकलवर बसविले व तिला ते एका निर्जनस्थळी घेऊन गेले. लक्ष्मीने अपहरणकर्त्यांकडची मोटारसायकलची चावी घेऊन तेथून पळ काढला व इतर लोकांच्या मदतीने अपहरणकर्त्यांना गजाआड केले. 2016 साली छत्तीसगढ सरकारने लक्ष्मीला ‘राज्य वीरता पुरस्काराने’ सन्मानित केले व राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी तिची शिफारस केली. ही शिफारस मान्य करून राष्ट्रीय शौर्य पुरस्कारासाठी तिची  निवड करण्यात आली.
 

संबंधित बातम्या
Back to top button