टेस्ला मॉडेल एक्स | पुढारी | पुढारी

टेस्ला मॉडेल एक्स | पुढारी

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात टेस्ला मॉडेल एक्स ही संपूर्ण इलेक्ट्रीककार ग्राहकांच्या सेवेसाठी दाखल झाली. अत्यंत आधुनिक अशी ही कार जगातील पहिली लक्झरी एसयुव्ही कार आहे. एकूण सात आसनाची ही कार संपूर्ण चार्ज असेल तर सुमारे 250 मैल प्रतितास वेगाने धावू शकते. केवळ 3.2 सेकंदात ही कार 60 मैल प्रतितास एवढा वेग पकडते.

या कारचे दरवाजे एखाद्या पक्ष्याच्या पंखाप्रमाणे वर उघडतात. बॅटरी पॅक या कारला लो ग्रॅव्हिटी प्रदान करत असल्याने ही कार चालवताना स्पोर्टस् कार चालवण्याचा आनंद मिळतो. अर्थात खनिज तेलावर न चालता 

विजेवर चालणारी ही कार संपूर्ण प्रदूषणमुक्त आहे. कारची किंमत थोडी महाग म्हणजे 1,30,000 डॉलर्स असली तरी ही भविष्यातील मोटार उद्योगाची झलक या कारमुळे पाहायला मिळते.
 

संबंधित बातम्या

Back to top button