अजब गजब,अद्भुत ऊर्जास्रोत | पुढारी | पुढारी

अजब गजब,अद्भुत ऊर्जास्रोत | पुढारी

संपूर्ण जगाला ऊर्जास्रोतांच्या कमतरतेची समस्या भेडसावते आहे. जगातील खनिज तेलसाठे कधी ना कधी संपुष्टात येणार आहेत. मात्र शास्त्रज्ञांनी असा एक अद्भुत ऊर्जास्रोत शोधण्याचा दावा केला आहे. ज्यामुळे जगाला कधीही ऊर्जा संकटाला तोंड द्यावे लागणार नाही.

हा अद्भुत ऊर्जास्रोत आहे हेलिअम 3 हा हेलिअम मूलद्रव्याचा किरणोत्सर्गी आयसोटोप. अणुकेंद्रात दोन प्रोटॉन्स व एक न्यूट्रॉन्स असलेल्या या आयसोटोपचा 250 टन एवढा साठा सार्‍या जगासाठी पुरेल एवढी ऊर्जा निर्माण करू शकतो. पृथ्वीवर या मूलद्रव्याचे सापडणे जरी दुर्मीळ असले तरी चंद्रावर याचा मुबलक साठा आहे. चीन व अमेरिकासारखे देश या मूलद्रव्याला चंद्रावरून पृथ्वीवर आणण्याच्या प्रयत्नात आहेत. 

हेलिअम 3 आपल्याला प्रदूषणमुक्त अणुऊर्जा पुरवू शकेल. सध्या हेलिअम 3 ची किंमत 300 कोटी डॉलर्स प्रती टन एवढी प्रचंड असली तरी चंद्रावरून हेलिअम 3 आणण्यात आपण यशस्वी झालो तर ही किंमत कमी होईल.

संबंधित बातम्या

Back to top button