सफेद अल्बिनो कोब्रा | पुढारी | पुढारी

सफेद अल्बिनो कोब्रा | पुढारी

ज अद्भुत प्राणी जगत!

गातील अत्यंत दुर्मीळ सर्प प्रजातींपैकी एक सफेद अल्बिनो कोब्रा हा चीन सहित भारतीय उपखंड व आग्‍नेय आशियातील देशांत आढळतो. या  श्ाुभ्र सफेद रंगाच्या नागाचे वैशिष्ट्य म्हणजे जन्मत:च याचा रंग पांढरा नसतो. जसजसे वय वाढत जाते तसतसा हा पांढरा होत जातो. पूर्ण वाढ झालेल्या कोब्य्राची लांबी साडेचार ते साडेसात फुटापर्यंत असते. शक्यतो हा जमिनीवर आढळतो मात्र हा पाण्यातही सहज पोहू शकतो.

इतर कोब्य्राप्रमाणेच हा कोब्राही विषारी आहे. याचे विष मज्जातंतू व पेशींच्या कार्यप्रणालीवर हल्‍ला चढविते. मात्र हा नाग उगाचच कोणावर हल्‍ला करत नाही. केवळ स्वत:च्या बचावासाठी व शिकार करताना तो आपले विषारी अस्त्र वापरतो. अल्बिनो कोब्रा हा अतिशय दुर्मीळ आहे. हल्‍लीच चंद्रपूर जिल्ह्यात त्याचे अस्तित्व आढळले. चीन व आग्‍नेय आशियाई देशांत औषध बनवण्यासाठी या सर्प 
प्रजातीची हत्या केली जात असल्याने हा प्राणी संकटात आहे.
 

संबंधित बातम्या

Back to top button