नाझिया | पुढारी | पुढारी

नाझिया | पुढारी


उत्तर प्रदेशातील एका छोट्याशा गावात राहणारी नाझिया 26 जानेवारी, 2018 रोजी एकदम प्रकाशझोतात आली जेव्हा तिला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदान केला. या बालिकेने हिंमत दाखवून गावातील बेकायदा जुगाराचे अड्डे बंदच केले नाहीत तर ते अड्डे चालविणार्‍या समाजकंटकांनाही तुरुंगात पाठविले.

गावातील बेकायदा जुगाराचे अड्डे चालविणार्‍या समाजकंटकांनी नाझिया व तिच्या कुटुंबीयांना धमक्या दिल्या,अगदी मारहाणही केली. स्थानिक पोलिसांनीही नाझियाला अपेक्षित सहकार्य केले नाही. बेकायदा जुगार चालविणार्‍यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे तिला घराच्या बाहेर पडणेही कठीण झाले. मात्र तिने हार मानली नाही. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना ट्विट करून तिने आपले गार्‍हाणे मांडले. मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिल्याने गावातील जुगार अड्डे बंद झाले व अड्डे चालविणारेही जेरबंद झाले. 

Tags : ankur story,naziya

संबंधित बातम्या
Back to top button