शोध देवाचा! | पुढारी | पुढारी

शोध देवाचा! | पुढारी

 लहानपणीच अनाथ झालेल्या टारोसाठी जीवन तसे सोपे नव्हते. गावोगावी जाऊन मिळेल ते काम करणे व बसलेला असताना त्याने एका  भिक्खूला ध्यानमग्‍न 

अवस्थेत पाहिले. त्या भिक्खूच्या सुरकुतलेल्या चेहर्‍यावर हास्य विलसत होते. कडक ऊन व आजूबाजूला घोंघावणार्‍या माशांमुळे त्याच्या ध्यानात काही व्यत्यय येत टारो विचार करू लागला ‘हे भिक्खू किती शांतचित्त आहेत. कोणतीही चिंता त्यांना सतावत नाही. मलाही यांच्यासारखं बनायचं आहे.’जेव्हा त्या भिक्खूने डोळे उघडले तेव्हा त्याची नजर टारोवर पडली. टारोने हात जोडले व नम्रपणे म्हणाला,

“गुरुवर्य मलाही भिक्खू बनायचे आहे. कृपया मला तुमचा शिष्य बनवा.” भिक्खूने विचारले. “तुला भिक्खू का बनायचे आहे?” टारो उत्तरला “कारण मला देवाचा शोध घ्यायचा आहे.” टारोला काही कळायच्या आत भिक्खू जागेवरून उठले व त्यांनी टारोला नदीपर्यंत खेचत आणले. टारोचे डोके त्यांनी नदीच्या पाण्यात बुडवले. टारोने पाण्याबाहेर डोके काढण्याची धडपड केली खरी पण व्यर्थ! तो भिक्खू टारोपेक्षा ताकदवान होता. एका मिनिटानंतर भिक्खूने टारोचे डोके पाण्याबाहेर काढले. टारोचे संपूर्ण शरीर वेदनेने ठणकत होते. 

तो जोरजोरात श्‍वास घेऊ लागला. काही वेळानंतर टारो शांत झाल्यावर भिक्खू त्याला म्हणाले, “मला सांग जेव्हा तुझे डोके पाण्याखाली होते तेव्हा तुला सर्वाधिक आवश्यकता कशाची होती?”टारोने उत्तर दिले “हवेची!” “फार छान!” भिक्खू म्हणाले,  “जेव्हा तुला हवेएवढी देवाची गरज भासेल तेव्हा माझ्याकडे ये.”

संबंधित बातम्या

Tags : ankur story, god, search

Back to top button