बालवीर : करणबीर सिंह | पुढारी | पुढारी

बालवीर : करणबीर सिंह | पुढारी

करणबीर सिंह या मुलाच्या नावात सिंह आहे व त्याची छातीही सिंहाची आहे. भारत-पाकिस्तान सरहद्दीवरच्या गगुवाल गावात राहणारा 17 वर्षांचा करणबीर बसमधून त्याच्या बहिणीसोबत शाळेत चालला होता. त्याच्यासोबत एकूण 37 मुले होती. त्यांची बस अचानक एका चिखल असलेल्या खड्ड्यात पडली व उलटी झाली. 

मुलांना काय करावे ते कळेना. सर्वजण जीवाच्या आकांताने ओरडू लागले. करणबीरने प्रथम बसमधून स्वत:ची सुटका केली व इतर मुलांना तो बाहेर काढू लागला. या अपघातात 7 मुले जागीच मृत्युमुखी पडली, तर 13 मुले गंभीर जखमी झाली. करणबीर सिंहने जर मुलांना वाचवण्याचे प्रयत्न केले नसते तर अनेक मुले मृत्युमुखी पडली असती. करणबीर सिंहला 2018 सालचा राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले व त्याच्या साहसाचा यथोचित सन्मान करण्यात आला.

संबंधित बातम्या
Back to top button