कथा : करामती कोंबडी | पुढारी | पुढारी

कथा : करामती कोंबडी | पुढारी

जॉन एका गरीब कुटुंबात जन्मला होता. एके दिवशी दिवसभर कष्ट करून त्याला मजुरीच्या पैशाच्याबदल्यात एक कोंबडीच मिळाली. ती कोंबडी घेऊन तो निराशेनेच घरी आला. दुसर्‍या दिवशी त्या कोंबडीने चक्‍क बारा अंडी दिली. जॉन व त्याचे कुटुंबीय चकीत झाले. करामती कोंबडी दररोज बारा अंडी देऊ लागल्याने जॉनला थोडे बरे दिवस आले. एकेदिवशी जॉनने ती कोंबडी गावच्या जमीनदाराला चांगल्या मोबदल्यात विकली. घरी परतताना एका खाणावळीत जॉन जेवत असताना ती करामती कोंबडी क्लक क्लक आवाज करत पुन्हा त्याच्यासमोर हजर झाली. त्या आवाजाने खाणावळीचा मालकही बाहेर आला. खाणावळीच्या मालकाने जॉनकडे ती कोंबडी मागितली तेव्हा जॉनने स्पष्ट शब्दांत त्याला सांगितले की कोंबडी त्याने जमीनदाराला विकली आहे व ती आता जमीनदाराच्या मालकीची आहे. खाणावळीचा मालक म्हणाला.

‘तू ही कोंबडी स्वत:कडेच ठेवू शकतोस. कोंबडीचा मोबदला तुझा व कोंबडीही तुझी असा तुझा दुहेरी फायदा होईल की नाही मूर्खा?’जॉनने तसे करण्यास सपशेल नकार दिला. कोंबडी जमीनदाराला परत करण्यासाठी तो त्याच्या घरी गेला. जॉनचा प्रामाणिकपणा पाहून जमीनदाराने त्याला कोंबडी परत केली व कोंबडीचे पैसेही ठेवून घेण्यास सांगितले.

संबंधित बातम्या
Back to top button