आजचे राशिभविष्य (१६ मे २०२३) | पुढारी

आजचे राशिभविष्य (१६ मे २०२३)

आजचे राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : इतरांच्या गरजा तुमच्या इच्छेच्या आड येतील. परंतु त्यामध्ये तुमची काळजी हाच भाग असेल. तुमच्या भावनांना रोखू नका आणि आराम करा.
वृषभ
वृषभ

वृषभ : वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो. पण तुम्ही डोके शांत ठेवणे गरजेचे. इच्छाशक्ती आहे तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : चांगले वाचन करून तुमच्या मनाला, विचारांना खाद्य पुरवा. आज केलेली गुंतवणूक तुमच्या आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरेल.
कर्क
कर्क

कर्क : मानसिक स्पष्टता टिकविण्यासाठी संभ—म आणि नैराश्यापासून दूर राहा. सहकुटुंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंदी राहील.
सिंह
सिंह

सिंह : पत्नीशी सुसंवाद साधून मिलाफ साधणारा दिवस. कुटुंबात गुंतवणूक ही प्रेम आणि विश्वासाशी बांधिलकी ठेवणारी असावी.
राशिभविष्य
कन्या

कन्या : खासगी आयुष्याबद्दल मित्र चांगला सल्ला देतील. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासा तरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा.
तुळ
तुळ

तूळ : चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. मनोबल उंचावेल.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : तुमच्या आयुष्यापेक्षाही तुम्ही ज्या व्यक्तीवर अधिक प्रेम करता ती व्यक्ती भेटेल. विद्यार्थ्यांना आजचा दिवस चांगला जाईल.
राशिभविष्य
धनु

धनु : आश्चर्यकारक संदेश तुम्हाला गोड स्वप्न दाखवेल. कामाच्या जागी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा.
राशिभविष्य
मकर

मकर : वैरभाव महागात पडू शकतो. त्यामुळे सहिष्णुतेला, उदार स्वभावाला सुरुंग लागू शकतोच; पण विचार करण्याच्या शक्तीला धक्का लागू शकतो.
कुंभ
कुंभ

कुंभ : मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. सशक्त मन हेच सशक्त शरीरामध्ये वास करते.
मीन
मीन

मीन : तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील.

Back to top button