हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज का होते कमी? | पुढारी

हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज का होते कमी?

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सध्या जगभर इलेक्ट्रिक म्हणजेच विजेवर चालणार्‍या गाड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहनांमुळे हवेचे प्रदूषण होत नाही, तसेच पेट्रोल, डिझेलचे वाढलेले दर पाहता पैशांचीही बचत होत असते.

तुम्हीही अशी इलेक्ट्रिक कार किंवा बाईक वापरत असाल, तर तुम्हालाही हिवाळ्यात अशा गाड्या थोडी कमी रेंज देत असल्याचे जाणवले असेल. यामागचे नेमके कारण काय आहे, जाणून घ्या. इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज हिवाळ्यात किती कमी होते, हे त्या गाडीवर तसेच वातावरणात किती बदल झाला आहे, यावर अवलंबून असते.

अमेरिकन ऑटोमोबाईल असोसिएशननुसार, थंड हवामानात इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज 40 टक्क्यांनी कमी होते. इलेक्ट्रिक गाड्या या ऊर्जेसाठी बॅटरीवर अवलंबून असतात. हिवाळ्यातील थंडीमुळे या बॅटरीतील केमिकल आणि फिजिकल रिअ‍ॅक्शनवर परिणाम होऊन, ऊर्जा निर्माण करण्याचा त्यांचा वेग मंदावतो. त्यामुळे हिवाळ्यात इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज कमी होते.

Back to top button