Ganesh Utsav 2023 : श्री नृसिंहसरस्वतींची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : श्री नृसिंहसरस्वतींची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेश मूर्तींची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण करण्यात आली. दांडपट्टा लेझिम, सारखे शिवकालीन मर्दानी खेळ खेळण्यात आले. तसेच डी.जे. लेझर शो मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री नृसिंहसरस्वतींची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

श्री नृसिंहसरस्वतींची आरती

कृष्णा पंचगंगा संगम निजस्थान ।
चरित्र दावूनि केले गाणगापुरी गमन ।
तेथे श्रेष्ठ भक्त त्रिविक्रमयति जाण ।
विश्वरूपें तया दिधले दर्शन ।

जयदेव जयदेव जय श्री गुरूदत्ता ।
नरसिंसरस्वती जय विश्वंभरिता ॥ धृ ॥

वंध्यासाठी वर्ष पुत्रनिधान ।
मृतब्राह्मण उठविला तीर्थ शिंपून ।
वांझ महिषी काढवी दुग्ध दोहून ।
अत्यंजाचे वदनी निगम संपूर्ण ॥१॥

जयदेव जयदेव जय श्री गुरूदत्ता ।
नरसिंसरस्वती जय विश्वंभरिता ॥ धृ ॥

शुष्क काष्ठी पल्लव दावूनि लवलाही ।
कुष्ठी ब्राह्मण केला शुध्द निज देही ।
अभिनव लीला त्यांची वर्णू मी कायी ।
ग्लेंच्छ राजा येऊनि वंदी श्रीपायी ॥२॥

जयदेव जयदेव जय श्री गुरूदत्ता ।
नरसिंसरस्वती जय विश्वंभरिता ॥ धृ ॥

दीपावलीचे दिवशी भक्त येऊनि।
आठही जण ठेविती मस्तक श्रीचरणी ।
आठही ग्रामी भिक्षा केली ते दिनी ।
निमिषमात्रें तंतुक नेला शिवस्थानी ॥३॥

जयदेव जयदेव जय श्री गुरूदत्ता ।
नरसिंसरस्वती जय विश्वंभरिता ॥ धृ ॥

ऐसे चरित्र दावूनि जडमूढ उध्दरिले ।
भक्तवत्सल ब्रीद अपुले मिरविले ।
अगाध महिमा म्हणवूनि वेदश्रृति बोले ।
गंगाधर तनय वंदी श्रीपाउलें ॥४॥

हेही वाचलंत का? 

Back to top button