Ganesh Utsav 2023 : श्री नृसिंहांची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : श्री नृसिंहांची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेश मूर्तींची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. मिरवणुकांमध्ये गुलालाची उधळण करण्यात आली. दांडपट्टा लेझिम, सारखे शिवकालीन मर्दानी खेळ खेळण्यात आले. तसेच डी.जे. लेझर शो मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री नृसिंहाची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

श्री नृसिंहांची आरती

जयदेव जयदेव जय शामराजा ।
आरती ओवाळू स्वामी निज काजा । जयदेव. ॥धृ॥

स्तंभी गडगड गर्जत नरहरि कार्याते ।
तरतर तरूवर फोडित जानूभड धाके ॥
भडभड दिव्यश्रोणी मुखश्रोणित फडके ।
तरतर तरूवर मोडित केसरिगुण फडके ॥

संबंधित बातम्या

जयदेव जयदेव जय शामराजा ।
आरती ओवाळू स्वामी निज काजा । जयदेव. ॥धृ॥

गडगड गर्जत आला स्तंभाबाहेरी ।
धडधड धावुनि धरिला अमरांचा वैरी ॥
चरचर उदर फाडुनि अंकी नखधारी ।
भडभड शोणित पिऊनी दनुजाते मारी ॥1॥

जयदेव जयदेव जय शामराजा ।
आरती ओवाळू स्वामी निज काजा । जयदेव. ॥धृ॥

लवथव दाढा जिव्हा विक्राळ वदनीं ।
धगधग अग्निज्वाळा निघताती नयनी ॥
अंकावरूनी लोटुनि दनुजाते अवनीं ।
अवलोकी प्रल्हादा सप्रेमें नयनी ॥2॥

जयदेव जयदेव जय शामराजा ।
आरती ओवाळू स्वामी निज काजा । जयदेव. ॥धृ॥

वृंदारककुमरा आलिंगन देतां ।
नरकेसरि सुख झाले अंतरिच्या पाहता ॥
कर्पूर ओवाळून सुरवर मुनि जाता ।
स्वहीत नागेशात्मज प्रभुविठ्ठलकांता ॥3॥

जयदेव जयदेव जय शामराजा ।
आरती ओवाळू स्वामी निज काजा । जयदेव. ॥धृ॥

हेही वाचलंत का? 

Back to top button