आजचे राशिभविष्य (दि. २८ सप्टेंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २८ सप्टेंबर २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष : आरोग्य उत्तम राहून मानसिक स्वास्थ्य लाभेल. कामातील उत्साह वाढेल. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. जोडीदाराचा सल्ला उपयुक्त ठरेल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ : दीर्घकालीन अडलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. महत्त्वाच्या कामासाठी प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसिद्धी होईल.

 

मिथुन
मिथुन
मिथुन ः मान्यवरांच्या ओळखी होऊन मदत लाभेल. मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळेल.

 

कर्क
कर्क
कर्क ः रखडलेली कामे मार्गी लागतील. ओळखीमुळे कामे होतील. आजची कामे उद्यावर ढकलू नका. द्विधा मनःस्थितीमध्ये निर्णय घेऊ नका.

 

सिंह
सिंह
सिंह ः अचानक धनलाभ संभवतो. बौद्धिक क्षमता वापरून कार्य साधता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात सक्रिय भाग घ्याल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः व्यवसायात नवीन तंत्रज्ञान वापरू शकाल. नोकरीमध्ये बदलीची शक्यता. कामात बदल शक्य. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.

 

राशिभविष्य
तुळ
तुळ : कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या सल्ल्याचा उपयोग होईल. नोकरीत सामान्य परिस्थिती राहून व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील.

 

वृश्‍चिक
वृश्‍चिक
वृश्चिक ः रोजच्या जीवनात बदल घडेल. मालमत्तेविषयीची कामे मार्गी लागतील. महत्त्वाची कामे उरकून घ्या. नोकरीत कामाचा ताण जाणवेल.
राशिभविष्य
धनु
धनु ः जवळचे प्रवास घडतील. कोणत्या तरी धार्मिक पवित्रस्थळी भेट द्याल.घरगुती कामे होतील. चांगल्या वार्ता कानी येतील.

 

मकर
मकर
मकर :  जमा-खर्चाचा ताळमेळ बसेल. त्यामुळे समाधान वाटेल. नातेवाईक भेटतील. घरात आनंदी वातावरण राहील. नोकरीत अस्थिरता भासू शकते.

 

कुंभ -
कुंभ
कुंभ  : धार्मिक कार्यात रस घ्याल. नोकरीत आपल्याला महत्त्व दिले जाईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कानावर पडतील. भावंडांशी असलेले गैरसमज दूर करण्यात यश.

 

मीन
मीन
मीन : मनावरील ताण निवळेल. नोकरीत उत्साहवर्धक घटना घडतील. अनपेक्षितपणे कामे लवकर होतील. जोडीदाराशी संबंध मधुर राहतील.

Back to top button