आजचे राशिभविष्य (दि. २५ सप्टेंंबर २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २५ सप्टेंंबर २०२२)

राशिभविष्य

मेष : विविध मार्गांनी धनलाभ झाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली राहील; परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. काहींना दूरचे प्रवास करावे लागतील.

राशिभविष्य

वृषभ : प्रवासाचे योग आहेत. खर्चाचे प्रमाण वाढत जाईल. आर्थिक आवक मनासारखी राहील. नोकरीत नवीन जबाबदारी पत्करावी लागेल.

राशिभविष्य

मिथुन : अनुकूल दिवस राहील. भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग, नोकरीत चांगली परिस्थिती राहील. काहींची बदली होऊ शकते.

राशिभविष्य

कर्क : कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. भाग्याची साथ राहील. प्रवासात थोडी दगदग होऊ शकते. नोकरीत बदलीची शक्यता.

राशिभविष्य

सिंह : अनेक कामे मार्गी लागतील. नोकरीत चांगल्या संधी चालून येतील. व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळेल. अनेक घटनांच्या केंद्रस्थानी आपण राहाल.

राशिभविष्य

कन्या : कौटुंबिक सुख मिळेल. जीवनसाथीशी आपले संबंध मधुर राहतील. प्रेमीजनांना उत्तम काळ. भेटवस्तूंची देवाणघेवाण होऊ शकते.

राशिभविष्य

तूळ : धनप्राप्ती होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत राहील. मात्र, खर्चाचे प्रमाण वाढेल. नोकरीत प्रगतीचे योग जोडीदाराशी थोडा वाद होऊ शकतो.

राशिभविष्य

वृश्चिक : नोकरी, व्यवसाय, धंदा यामधील परिस्थिती समाधानकारक राहील. आर्थिक आवक मनासारखी राहील. नोकरीत बढतीचे योग.

राशिभविष्य

धनु : नोकरीत कामाचा ताण जाणवेल, पण केलेल्या कष्टाचे फळ मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता पण बदलीची तयारी ठेवावी लागेल.

राशिभविष्य

मकर : इतरांशी गोड बोलून आपली कामे करून घ्या. मुत्सद्दीपणाने वागावे लागेल. कामात थोडे बदल होऊ शकतात. मनासारखे खाणे-पिणे मिळेल.

कुंभ -

कुंभ : रागावर नियंत्रण महत्त्वाचे राहील. तडकाफडकी निर्णय घेणे किंवा कोणालाही टाकून बोलणे तसेच कोणालाही अपमानास्पद वागणूक देणे टाळा.

मीन

मीन : तरुण-तरुणींना प्रेमात यश लाभून आपला आवडता जीवनसाथी निवडता येईल. प्रेमामध्ये यश मिळेल. धार्मिक कार्यक्रमांत सक्रिय भाग घ्याल.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button