गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन पंचांगाप्रमाणे कसे करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती | पुढारी

गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन पंचांगाप्रमाणे कसे करावे? जाणून घ्या महत्वाची माहिती

पुढारी ऑनलाईन: गौरी आवाहन, पूजन आणि विसर्जन हे तिन्ही दिवस नक्षत्र प्रधान आहेत. शनिवारी (दि.३) रोजी अनुराधा नक्षत्रावर गौरी आवाहन केले जाते, जेष्ठा नक्षत्रावर पूजन तर मूळ नक्षत्रावर विसर्जन केले जाते.

उद्या (शनिवार) दिवसभर अनुराधा नक्षत्र असून दिवसभरात कधीही परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करता येणार आहे अशी माहिती दाते पंचांगचे ओंकार दाते यांनी दिली आहे. त्यासाठी विद्रुत योग, भद्रा योग या दोषांचा विचार करण्याची अजिबात गरज नाही. ४ तारखेला म्हणजेच रविवारी आपल्या परंपरेप्रमाणे गौरी पूजन करावे. तसेच सोमवारी (दि.५) मूळ नक्षत्र रात्री ८:०६ पर्यंतच असून त्याच्या आत गौरी विसर्जन करायचे आहे. याच दिवशी दोरे घेणे हा विधी असतो, हा विधीही रात्री ८:०६ च्या आधी आणि विसर्जनानंतरच करायचा आहे.

 

Back to top button