आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दि. २५ ऑगस्ट २०२२)

राशिभविष्य
मेष
मेष ः आरोग्याच्या तक्रारींमुळे चिंता वाटेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मित्र आणि सहकारीवर्गाशी चांगले वागा. निर्णयशक्ती कमी होईल.
राशिभविष्य
वृषभ
वृषभ ः काम करण्याची क्षमता, उत्साह, चैतन्य असेल. वरिष्ठांची मर्जी राखाल. पदोन्नतीचे योग आहेत. वस्त्र-अलंकार खरेदी कराल. नवे मित्र होतील.
राशिभविष्य
मिथुन
मिथुन ः जबाबदार्‍या पूर्ण करण्यासाठी भरपूर वेळ मिळेल. क्षमतेवर विश्वास ठेवा. प्रगती कराल. मातुल घराण्याचे सहकार्य लाभेल.
राशिभविष्य
कर्क
कर्क ः दिवस चांगला. चांगल्या संधी येतील. त्याचा उपयोग करून घ्या. मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रवासात फायदे होतील. मेजवानीचा आस्वाद घ्याल.
सिंह
सिंह
सिंह ः दिवस संमिश्र घटनांचा असेल. मानसिक त्रास होण्याची शक्यता. अडचणी येतील. शत्रूला नामोहराम कराल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल.
राशिभविष्य
कन्या
कन्या ः कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतः व्यवसायात लक्ष घाला. आर्थिक नुकसान टळेल. नातेसंबंधात काळजी घ्या. अडचणी-अडथळे उद्भवतील.
राशिभविष्य
तुळ
तूळ ः विपरीत परिस्थितीत काम करावे लागेल. मानसिक अवस्था चांगली ठेवा. विनाकारण वाद होतील. शत्रू विनाकारण त्रास देण्याची शक्यता. त्यांना योग्य उत्तर द्या.
राशिभविष्य
वृश्चिक
वृश्चिक ः तुमच्या कार्यक्षेत्रात चांगली भरारी घ्याल. कार्यक्षमतेमुळे प्रगती होईल. आपल्या हातून चांगली कामे होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
राशिभविष्य
धनु
धनु ः मन शांत व स्थिर असेल. कामे सहज व सुरळीत होतील. मालमत्तेविषयी काही कामे असल्यास ती पुढे सरकतील. घरातील ज्येष्ठांचे सहकार्य मिळेल.
राशिभविष्य
मकर
मकर ः विपरीत परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळाल. ग्रहमान चांगले आहे. भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता. आरोग्याच्या थोड्याफार कुरबुरी जाणवतील.
कुंभ -
कुंभ
कुंभ ः दिवसाची सुरुवात चांगली होईल. सत्कार्य कराल. आनंदी राहाल. कौटुंंबिक सौख्य उत्तम राहील. स्वतःच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नात वाढ होईल.
राशिभविष्य
मीन
मीन ः आजूबाजूच्या लोकांना तुमची किंमत कळेल. छंदासाठी मित्र मदत करतील. नवीन संधी मिळतील; पण काही कारणाने ती स्विकारू शकणार नाही.

– ज्यो. मंगेश महाडिक

Back to top button