आजचे राशिभविष्य (दिनांक २६ जुलै २०२२) | पुढारी

आजचे राशिभविष्य (दिनांक २६ जुलै २०२२)

राशिभविष्य

मेष– साहसाने कामे मार्गी लागतील, आर्थिक प्रगती होईल, कलागुणांना वाव मिळेल, जवळच्या लोकांची मदत मोलाची ठरेल. भावंडांबरोबरचे वाद मिटतील.

राशिभविष्य

वृषभ– कौटुंबिक कलह टाळावा, वस्तू हरवण्याची शक्यता आहे, वाणीवर नियंत्रण आवश्यक आहे, विनाकारण वेळ वाया जाईल.

राशिभविष्य

मिथुन– अनपेक्षितपणे लाभ होतील, स्वभावात सकारात्मक बदल होतील, प्रसन्नता लाभेल. अलंकार-वस्त्र खरेदी कराल, गुंतवणूक करण्यास योग्य दिवस.

राशिभविष्य

कर्क– सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील, आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस, व्यक्त होणे गरजेचे आहे.

राशिभविष्य

सिंह– अथक प्रयत्नांना यश मिळेल, प्रवासाचे योग, व्यवसायात धोरणांमुळे उत्कर्ष होईल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील.

राशिभविष्य

कन्या– कौतुकास्पद कार्य कराल, कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील, आनंददायी घटना घडतील, लोककार्यात सहभाग घ्याल.

राशिभविष्य

तुळ– कामांमध्ये अडचणी येतील, आत्मविश्वासाचा अभाव राहील, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, मानापमानांचे प्रसंग निर्माण होतील.

राशिभविष्य

वृश्चिक– प्रतिक्रिया देऊ नका, सावधपणे पावले उचला, आरोग्याच्या तक्रारी संभवतात, जुन्या मित्रांची भेट होईल, पदोन्नतीची संधी मिळेल.

राशिभविष्य

धनु– व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग, भागीदारीत लाभ होईल, कौटुंबिक सहलीचा योग, चर्चासत्रातून मोठे काम मिळेल, कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल.

राशिभविष्य

मकर– शत्रूंवर मात कराल, अनपेक्षित यश मिळण्याचे योग, सहकार्याने कामे मार्गी लागतील, प्रलंबित कामे पूर्ण होतील, उत्साहवर्धक वातावरण राहील.

कुंभ -

कुंभ– संततीबाबत चिंता निर्माण होईल, कामात एकाग्रता आवश्यक आहे, लॉटरी व सट्टा यात नुकसान होण्याची शक्यता आहे, सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील.

राशिभविष्य

मीन– वास्तुविषयक कामे लांबणीवर जातील, वादविवाद टाळावेत, प्रवासात मनःस्ताप होण्याची शक्यता, व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.

Back to top button