Proton Mail : गुगलच्या Gmail ला सर्वोत्तम पर्याय Proton Mail चा !!! - पुढारी

Proton Mail : गुगलच्या Gmail ला सर्वोत्तम पर्याय Proton Mail चा !!!

पुढारी ऑनलाईन डेस्क : इमेल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेलं आहे. Google ची इमेल सेवा Gmail आजची सर्वाधिक वापरली जाणारी इमेल सेवा आहे. गोपनीयतेच्या पातळीवर Gmail ही काही सर्वोत्तम सेवा नक्कीच नाही. गोपनीयता ज्यांच्यासाठी महत्त्वाची आहे, त्यांच्यासाठी सर्वोत्तम म्हणून Proton Mail चं नाव घेतलं जात. एंड टू एंड Encrypted इमेल हे Proton Mail चं वैशिष्ट्यं आहे.

जेव्हा आपण Gmail मध्ये काही मजकूर टाईप करत असतो, तेव्हा Gmail स्वतःच टायपिंगसाठी पर्याय सुचवंत. म्हणजेच Gmail ची Automated यंत्रणा तुमचा इमेल वाचत असते. पण समजा तुम्हाला तुमचा इमेल गोपनीय ठेवायचा असेल तर?

अशा वेळी End to End Encrypted सेवा या सर्वोत्तम ठरतात. End to End Encrypted म्हणजे नेमकं काय? समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पोस्टकार्ड पाठवलं तर काय होईल? हा पोस्टकार्ड पोस्टमन किंवा ज्याच्या हातात हा पोस्टकार्ड पडेल ती कोणतीही व्यक्ती त्यावरील मजकूर वाचू शकेल.

पण हेच पत्र जर तुम्ही एखाद्या बंद पाकिटातून पाठवलं तर? जी व्यक्ती हे पाकीट उघडणार आहे, त्यालाच त्या पत्रातील तपशील वाचता येईल. End to End Encrypted अशाचं प्रकारे काम करत. WhatsApp ही End to End Encrypted आहे.

तर इमेलमध्ये End to End Encrypted आजच्या घडीला Proton Mail ही सर्वांत मोठी सेवा आहे. २०१३ मध्ये जेनेव्हा येथे काही संशोधकांनी प्रोटोन मेलची निर्मिती केली. प्रोटोन मेलमधील कॅलेंडरही पूर्णपणे Encrypted आहे.

Proton Mail चे सर्व्हर जेनेव्हात असून स्वित्झर्लंडमधील डेटाचे कठोर कायदे त्यांना लागू होतात. त्यामुळेही प्रोटोन मेल सुरक्षित मानला जातो.  Gmail किंवा इतर इमेल सेवा ज्या सेवा देतात, त्या सर्व सेवा Proton Mail वरही मिळातात आणि जोडीने प्रोटोन मेल अधिक सुरक्षितही आहे.

पहा व्हिडीओ : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची फोनाफोनी!!

Back to top button