UNSC : पंतप्रधान मोदींच्‍या अध्‍यक्षतेखाली संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेची चर्चा | पुढारी

UNSC : पंतप्रधान मोदींच्‍या अध्‍यक्षतेखाली संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेची चर्चा

नवी दिल्‍ली; पुढारी ऑनलाईन :  संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेच्‍या( UNSC) वतीने आज सागरी सुरक्षेवर डिजिटल
माध्‍यमाव्‍दारे चर्चा होणार आहे. ( UNSC) च्‍या वतीने घेण्‍यात येणार्‍या चर्चेचे अध्‍यक्षस्‍थान पंतप्रधान नरेंद्र मोदी भूषविणार आहेत. या चर्चेत अध्‍यक्षस्‍थान भूषविणारी नरेंद्र मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान ठरणार आहेत.

यासंदर्भात माहिती देताना परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या निवदेनात म्‍हटले आहे की, १५ सदस्‍यांच्‍या ‘युएनएससी’चे अध्‍यक्षपद भारताने रविवार, १ ऑगस्‍ट रोजी स्‍वीकारले. सोमवारी सागरी सुरक्षा, शांतता आणि दहशतवाद प्रतिबंध अशा तीन विषयांवरी चर्चा आयोजित करण्‍यात आली आहे. यामध्‍ये पंतप्रधान नरेद्र मोदी हे ‘सागरी सुरक्षेला प्रोत्‍साहन देणे, आंततराष्‍ट्रीय सहकार्याची गरज’ या विषयावर भूमिका स्‍पष्‍ट करतील.

‘युएनएससी’ने आयोजित केलेल्‍या चर्चा आज (दि. ९) सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी व्‍हिडीओ कॉन्‍फरन्‍सच्‍या माध्‍यमातून होईल. या उच्‍चस्‍तरीय चर्चेमध्‍ये संयुक्‍त राष्‍ट्रांमधील उचस्‍तरीय तज्‍ज्ञ सहभागी हाेणार आहेत.

यापूर्वीही सागरी सुरक्षेवर चर्चा झाली आहे; पण प्रथमच सागरी सुरक्षेवरखुली चर्चा होत आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने म्‍हटले आहे. या वेळी नायजेरिया, केनिया, व्‍हिएतनामाचे राष्‍ट्राध्‍यक्ष, रशियाचे अध्‍यक्ष व्‍लादिमीर पुतीन, अमेरिकेचे परराष्‍ट्र मंत्री एंटोनी ब्‍लिंकन सहभागी होतील, असे पंतप्रधान कार्यालाच्‍या सूत्रांनी सांगितले.

युएनएससीमध्‍ये अमेरिका, चीन, ब्रिटन, रशिया आणि फ्रान्‍स हे स्‍थायी सदस्‍य आहेत. दोन वर्षांसाठी भारत संयुक्‍त राष्‍ट्र सुरक्षा परिषदेचा अस्‍थायी सदस्‍य आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडीओ : नीरज चोप्राच्या सुवर्णमय कामगिरीनंतर पीएम मोदींची ‘फोनाफोनी’!!

 

Back to top button