Chemical Free Jaggery : भेसळयुक्त गुळामुळे आरोग्यावर परिणाम, केमिकल विरहीत गुळ असा ओळखा | पुढारी

Chemical Free Jaggery : भेसळयुक्त गुळामुळे आरोग्यावर परिणाम, केमिकल विरहीत गुळ असा ओळखा

पुढारी ऑनलाईन डेस्क : गुळाचे आपल्या आहारातील महत्व पुराण काळापासून देण्यात आले आहे. गुळाचे आपल्या आरोग्याला खूप फायदे आहेत. साखरेपेक्षा सेंद्रिय गुळाचा (Chemical Free Jaggery) आहारात वापर केल्यास अनेक आजारांपासून आपली सुटका होते.

पण सध्या केमिकल घातलेला गुळ आणि सेंद्रिय गुळ कसा ओळखावा (How to identify Chemical free Jaggery) हा प्रश्न मोठा उभा राहत आहे. हा गुळ कसा ओळखावा तो आपण कसा सेवन करावा याविषयीची माहिती देणारा एक व्हिडिओ (Video) प्रसिद्ध शेफ पंकजा भदौरिया यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रसिद्ध शेफ भदौरिया याच्या माहितीनुसार, गुळ खाण्याआधी तो केमिकलयुक्त आहे की सेंद्रिय आहे हे माहिती करून घेणे गरजेचे आहे.
कारण भेसळयुक्त गुळामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. शुद्ध किंवा रसायनमुक्त गुळाचा रंग डार्क ब्राउन (Dark Brown) असतो. गुळाचा रंग फिकट पांढरा किंवा पिवळा असेल तर तो केमिकल असलेला गुळ आहे असे समजावा.

पांढऱ्या किंवा लाइट ब्राउन रंगाच्या गुळात केमिकल अथवा रंगाचा वापरू शकतात. यामुळे गुळ दिसायला आकर्षक वाटतो.
(Artificial Color) गुळात कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेटचा वापर केला जाऊ शकतो.

गुळाचे वजन वाढवण्यासाठी कॅल्शियम कार्बोनेटचा वापर केला जातो, तर गूळ चमकदार दिसावा यासाठी सोडियम बायकार्बोनेटचा वापर होतो, असे शेफ पंकज भदौरिया यांनी व्हिडिओतून स्पष्ट केले आहे.

Chemical free Jaggery : या आहेत सोप्या पद्धती…

साधारणपणे चांगल्या प्रतीच्या गुळाला तपकिरी रंग असतो. शेवटी थोडा कडवट लागतो.

गुळ विकत घेताना त्याची पारख करण्यासाठी तुम्हाला त्यातील एक तुकडा खावा लागेल, गुळ फक्त गोड लागला तर ठीक आहे.

जर तो खारट लागत असेल तर समजून जा गुळात केमिकलचे प्रमाण जास्त आहे.

जर गुळाची चव घेताना तो कडू चव असेल तर याचा अर्थ असा होतो की उकळण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्यात कारमेलिझेशन झाले आहे.

गूळ शुद्ध आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यात कोणत्या क्रिस्टल्सचा वापर केला आहे का हे तपासा. क्रिस्टल्सची उपस्थिती दर्शवते की गुळाची चव गोड करण्यासाठी तो अनेक प्रक्रियेतून गेला आहे.

गुळ जितका कठीण तितकी त्याच्या शुद्धतेची हमी असते. यावरून हे सिद्ध होते की ऊस उकळताना कोणतेही अॅडिटीव्ह वापरले गेले नाहीयेत.

Back to top button