मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्याला पुण्यातून घेतले ताब्यात  | पुढारी

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरविणाऱ्याला पुण्यातून घेतले ताब्यात 

पुणे : पुढारी वृत्तसेवा 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या माथेफिरुला पोलिसांनी सोमवारी(दि.२१) रात्री घोरपडी परिसरातून ताब्यात  घेतले. मुलाला शाळेत प्रवेश प्रवेश मिळाला नाही म्हणून त्याने धमकीचा फोन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. शैलेंद्र शिंदे ( रा. घोरपडी) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

30 मे 2021 रोजी मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी एका निनावी फोनद्वारे देण्यात आली होती.  त्यानंतर मंत्रालयात बॉम्बशोधक पथक दाखल झालं आहे.  निनावी धमकीचा फोन आल्यानंतर मंत्रालयातील पोलीस बंदोबस्तात वाढविण्यात आला होता. 

धमकीचा निनावी फोनद्वारे एक संशयित वस्तू मंत्रालय परिसरात ठेवण्यात आल्याची माहिती त्या फोनवरुन देण्यात आली होती.  त्यानुसार बॉम्बशोधक पथक आणि मुंबई पोलिसांचा मोठा फौजफाटही मंत्रालय परिसरात तैनात करण्यात आला होता. धमकीचा हा फोन कोणी केला ? याचा शोध मुंबई पोलिसांकडून घेतला जात होता. कोणती संशयित वस्तू मिळतेय का ? याचा कसून तपास केला जात होता.  

दरम्यान हा फोन पुण्यातून आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस यंत्रणा त्या दिवसापासून अफवा पसरवणाऱ्या आरोपीचा शोध घेत होती. दरम्यान हा आरोपी मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घोरपडी परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्याच्या चौकशीत त्याच्या मुलाचे शाळेत ऍडमिशन झाले नसल्याने व त्याच्याकडे कोणी लक्ष देत नसल्याने त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याला पुढील कारवाईसाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.

Back to top button