

महाड: अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मा. ना. किरेन रिजीजू यांची रायगड जिल्ह्यातील राज्यसभा खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील व जिल्ह्याचे महामंत्री सतीश धारप यांनी संसदेतील मंत्री दालनात भेट घेतली. रायगड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या म्हणजेच मुस्लिम, जैन व बौद्ध समाजाच्या अनेक प्रलंबित विकासकामांच्या मान्यता मिळण्याचे हेतूने भेट घेतली.
अलिबाग येथे 3 कोटी रुपयांचे मुस्लिम सामाजिक संकुल, अलिबाग, पेण, पनवेल, महाड येथे प्रत्येकी 3 कोटी रुपयांचे जैन समाजासाठी सामाजिक संकुल, महाड तालुक्यात बौद्ध समाजासाठी 10 कोटी रुपयांचे सामाजिक संकुल, पाली शहरात मुस्लिम समाजासाठी एका कोटी रुपयांचे शादीखाना उभारणे, श्रीवर्धन तालुक्यातील हरवीत गावात मुस्लिम सामाजिक संकुल उभारणी या प्रमुख कामांसह जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी अन्य 40 विकासाकामांना मंजुरी देण्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक कार्य मंत्री किरेन रिजीजू यांनी तत्वत: मान्य केले आहे.
येत्या फेब्रुवारी महिन्यात वरील सर्व 55 कामांना अंदाजे 50 कोटी रुपयांची तरतूद होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील यांच्या या प्रयत्नांचे भाजपा कार्यकर्त्यांकडून तसेच अल्पसंख्यांक समाजाच्या मुस्लिम जैन व बौद्ध धर्मीयांकडून विशेष कौतुक होतं आहे.