गावात डिजिटल लायब्ररी... केवायसी होणार सुलभ | पुढारी

गावात डिजिटल लायब्ररी... केवायसी होणार सुलभ

लहान मुले तसेच तरुणांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात यासाठी डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येईल. वॉर्ड आणि पंचायत स्तरावर या लायब्ररी उपलब्ध असतील. यामध्ये प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेतील पुस्तके उपलब्ध असतील. यामध्ये प्रत्येक वयोमानानुसार पुस्तके उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

सरकारी कार्यालये, वित्तीय संस्था येथे आपली वैयक्तिक माहिती अद्ययावत करण्यासाठी केवायसी अपडेट करा म्हणून सांगितले जाते. यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो आदी पुरावे त्याच्या फोटोकॉपीसह घेऊन स्वत: त्या व्यक्तीला जावे लागत असे. ही डोकेदुखी आता बंद होणार आहे. येथून पुढे तुम्ही जेथे आहात तेथूनच व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून केवायसी करता येणार आहे. जन-धन योजनेचे बँक खाते उघडण्याकरिता केवायसी प्रक्रिया व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. येत्या काळात व्हिडीओ केवायसीला प्रोत्साहन दिले जाईल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. तसेच पॅन कार्ड हे सरकारी एजन्सीजच्या डिजिटल सिस्टीमसाठी ओळख म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. ओळखीचा पुरावा म्हणून आता पॅन कार्ड वापरता येणार आहे. यामुळे अनेक उद्योजकांना फायदा होणार आहे.

सीतारामन यांनी सांगितले की, झअछ (पॅन) सरकारी एजन्सीच्या सर्व डिजिटल प्रणालींसाठी एक कॉमन ओळखपत्र म्हणून वापरले जाईल. तसेच केवायसी प्रोसेस सोपी करण्यासाठी डिजिलॉकर आणि आधारचा वापर केवायसी गरजा पूर्ण करण्यासाठी वनस्टॉप सोल्यूशन म्हणून केला जाईल, असे सीतारामन यांनी त्यांच्या बजेट भाषणात सांगितले.

Back to top button