बेळगाव : पंतप्रधानांसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विमानास मज्‍जाव | पुढारी

बेळगाव : पंतप्रधानांसाठी विमानतळ प्राधिकरणाकडून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या विमानास मज्‍जाव

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा दोन मोठे नेते एकाचवेळी एका ठिकाणी येणार असतील तर त्यापैकी वरिष्ठ नेत्याला स्थान असते. तसाच प्रकार आज (रविवार) बेळगावात दिसून आला. बेळगाव दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सांबरा विमानतळावरून जाणार असल्याने विमानतळ प्राधीकरणाने येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विमान उतवरण्यास मज्जाव केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी बेळगावात होते. सकाळी त्यांची सभा झाल्यानंतर 11.45 वाजता ते येथील सांबरा विमानतळावरून कारवार जिल्ह्यातील शीरसी येथे प्रचारासाठी जाणार होते. विशेष म्हणजे रविवारीच बेळगाव जिल्ह्यातील हारुगेरी व यरगट्टी येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सभा आहेत. त्यामुळे त्यांचे विमान बंगळूरहून 11.05 वा. सांबरा विमानतळावर येणार होते. परंतु, येथे पंतप्रधानांचे विमान उतरणार असल्याने विमानतळ प्राधिकरणाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे विमान येथे उतरवू दिले जाणार नसल्याचा संदेश शासनाला कळवला.

याबाबत मुख्यमंत्र्यांनीही फारसा वाद न घालता प्रोटोकॉलचा विचार करून सांबरा विमानतळावर विमान उतरवणे टाळले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पर्यायी मार्ग निवडला. बंगळूरहून ते विमानाने थेट कोल्हापूर विमानतळावर गेले. तेथून ते हेलीकॉप्टरद्वारे उगारला जाऊन त्यांनी हारूगेरी येथील सभेत भाग घेतला.

हेही वाचा : 

Back to top button