कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होणार नाही : सतीश जारकीहोळी | पुढारी

कोणत्याही मतदारसंघात बंडखोरी होणार नाही : सतीश जारकीहोळी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा ; काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची पहिली उमेदवारी यादी जाहीर केली असून दुसरी यादी येत्या १० एप्रिलपर्यंत जाहीर केली जाईल, असे कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे सचिव आ. सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

आ. जारकीहोळी म्हणाले, जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडून येणार आहेत. तीन मतदारसंघातील यादीसंदर्भात चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीत बंडखोरी झाल्याने सौंदत्ती आणि रायबाग मतदारसंघ गमावलो होतो. मात्र. यावेळी हायकमांडने जुळवाजुळव करून काँग्रेसला विजयी करण्याची जबाबदारी दिली आहे.

सध्या कोणत्याही मतदार संघात बंडखोरी नाही. बेळगाव दक्षिण मतदारसंघात काँग्रेसचा सक्षम उमेदवार दिला जाईल. कोणत्याही कारणास्तव बाहेरून उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्मशानभूमीत पूजन करून निवडणूक प्रचार वाहनाचा प्रारंभ केला जाईल. यावेळी केपीसीसी सदस्य सुनील हनमाण्णवर, राजेंद्र पाटील, चिकोडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण चिंगळे आदी उपस्थित होते.

Back to top button