महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी | पुढारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर बुधवारी (दि. 11) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीत कर्नाटकाच्या अंतरिम अर्जावर काय होणार, याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.

गतवर्षी 30 ऑगस्ट रोजी सीमाप्रश्नावर सुनावणी झाली होती. यावेळी कर्नाटक सरकारच्या वकिलांनी तयारीसाठी वेळ मागितला होता. त्यानुसार 23 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित करण्यात आली होती. मात्र त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायमूर्ती उपलब्ध नसल्याने सुनावणी लांबणीवर पडली. आता सुनावणीसाठी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.
कर्नाटकाने सर्वोच्च न्यायालयाला दोन राज्यातील सीमा निश्चित करण्याचा अधिकार नाही, असे सांगत अंतरिम अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांपासून अंतरिम अर्जावर सुनावणी झालेली नाही. पण, न्यायालयाने वारंवार सुनावणी लांबणीवर टाकण्यात येणार नाही, असा इशारा दिला असल्यामुळे बुधवारची सुनावणी महत्वाची असणार आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. राकेश द्विवेदी व अ‍ॅड. वैद्यनाथन बाजू मांडणार आहेत.

Back to top button