Asian Para Games : भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला! आशियाई पॅरा गेम्समध्ये पदकांची सेंच्युरी

Asian Para Games : भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला! आशियाई पॅरा गेम्समध्ये पदकांची सेंच्युरी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्यानंतर आशियाई पॅरा गेम्समध्येही भारतीय खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एक नवा इतिहास रचत भारताने आता पदकांची शंभरी पार केली आहे. भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात आतापर्यंत १०० पदकांवर मोहोर उमटवली आहे. यात २६ सुवर्ण, २९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या कामगिरीच्या रुपानं भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. याआधी २०१८ मध्ये इंडोनेशिया पॅरा गेम्समध्ये भारताने ७२ पदके जिंकली होती.

संबंधित बातम्या : 

शुक्रवारपर्यंत (दि.२७) भारताने एकूण ९९ पदके जिंकली होती. आज (दि.२८) दिलीप महादू गावित याने पुरुषांच्या 400 मी – T47 स्पर्धेत 49.48 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकून शानदार सुरुवात केली. या पदकासह भारताने या स्पर्धेत पदकांची शंभरी पार केली आहे.

स्विमींगमध्ये पहिले पदक

सुयश जाधवने भारताच्या खात्यात पहिल्या पॅरास्विमिंग पदकाची भर घातली. त्याने शुक्रवारी पुरुषांच्या 50 मी बटरफ्लाय S7 इव्हेंटमध्ये 32.22 ची वेळ नोंदवून कांस्य पदक जिंकले. यासह भारताची पदक संख्या 99 वर पोहचवली. सुयशच्या शानदार कामगिरीने त्याला पॅरिस ऑलिपिकचे तिकीट मिळाले आहे.

शुक्रवारी नितीश कुमार आणि तरुण या भारतीय जोडीने पुरुष दुहेरी SL3-SL4 बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले. तसेच सुहास यथीराजने बॅडमिंटन एकेरी SL-4 मध्ये सुवर्णपदक जिंकले. भारताला बॅडमिंटन एकेरी SL-3 स्पर्धेत दोन पदके मिळाली. प्रमोद भगतने सुवर्णपदक तर नितेश कुमारने रौप्यपदक पटकावले. महिला एकेरीच्या SU-5 प्रकारात तुलसीमती मुरुगेसनने चीनच्या क्विशिया योगाचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. पुरुषांच्या 1500 मीटर टी-38 शर्यतीत रमण शर्माला सुवर्णपदक तर देवेंद्र कुमारला डिस्कस थ्रोमध्ये सुवर्णपदक मिळाले. राकेश कुमारने तिरंदाजीमध्ये पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. पुरुष दुहेरीच्या एसयू-5 सामन्यात चिराग बरेथा आणि राजकुमार यांना इंडोनेशियाकडून पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. लक्ष्मीने डिस्कस थ्रो F37/38 स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. भालाफेकमध्ये प्रदीप कुमारने रौप्य आणि अभिषेक चमोलीने कांस्यपदक जिंकले.

स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पदके जिंकणारे भारतीय खेळाडू

सुवर्ण : देवेंद्र कुमारने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : रमण शर्माने पुरुषांच्या T38 1500 मध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : शीतल देवीने महिलांच्या कंपाउंड तिरंदाजी ओपनमध्ये सुवर्णपदक जिंकले
सुवर्ण : प्रमोद भगतने पुरुष एकेरी SL3 मध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : तुलसीमाथी मुरुगेसनने महिला एकेरी SU5 बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकले
सुवर्ण : सुहास यथीराजने पुरुष एकेरी SL 4 बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : नितेश कुमार-तरुणने पुरुष दुहेरी SL3-SL4 बॅडमिंटनमध्ये सुवर्ण जिंकले
सुवर्ण : सोलैराज धर्मराजने पुरुषांच्या T64 लांब उडीत सुवर्णपदक जिंकले.
रौप्य : चिराग बरेथा-राजकुमार यांनी पुरुष दुहेरी SU5 मध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : परदीप कुमारने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : प्रदीप कुमारने पुरुषांच्या F-54 भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : कृष्णा नगरला पुरुष एकेरी SH6 मध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले
रौप्य : राकेश कुमारने पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड तिरंदाजीमध्ये रौप्यपदक जिंकले
रौप्य : मानसी जोशी-तुलासिमाथी सुंदरेसन यांनी महिला दुहेरी SL3-SU5 चकमकीमध्ये रौप्यपदक जिंकले.
कांस्य : सौरवने पुरुषांच्या F64 डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : अभिषेक चमोलीने पुरुषांच्या F-54 भालाफेकमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : लक्ष्मीने महिलांच्या F37/38 डिस्कस थ्रोमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : नितेश कुमारने पुरुष एकेरी SL3 मध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : मनूने पुरुषांच्या F37 शॉटपुटमध्ये कांस्यपदक जिंकले
कांस्य : सुयश जाधवने पुरुषांच्या S7 50 मीटर बटरफ्लायमध्ये कांस्यपदक जिंकले.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news