Asia Cup IND vs PAK : पाक संघाला मोठा झटका! आफ्रिदी पाठोपाठ ‘हा’ गोलंदाज बाहेर…

Asia Cup IND vs PAK : पाक संघाला मोठा झटका! आफ्रिदी पाठोपाठ ‘हा’ गोलंदाज बाहेर…
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup IND vs PAK : आशिया चषक स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी होणा-या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे. पण या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी पाकिस्तानला एकामागोमाग धक्के बसत आहेत. काही दिवसंपूर्वी त्यांच्या संघाचा आघाडीचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्या धक्क्यातून पाकिस्तानी संघ अद्याप सावरलेला नाही. दरम्यान, आता पुन्हा एकदा पाकिस्तानला आणखी एक मोठा झटका बसणार असल्याचं दिसत आहे. पाकिस्तानचा आणखी एक गोलंदाज मोहम्मद वसीमही आशिया चषक स्पर्धेच्या काही सामन्यांमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. प्रशिक्षणादरम्यान मोहम्मद वसीमच्या पाठीत दुखत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र तो खेळणार की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.

शाहीन शाह आफ्रिदीच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाजीची कमान कोण सांभाळणार हा पाकिस्तान संघासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. दरम्यान, एका क्रीडा वाहिनीने दिलेल्या एका अहवालात म्हटले आहे की दुबईला पोहोचल्यानंतर मोहम्मद वसीम नियमितपणे संघासोबत आहे आणि सराव सत्रातही भाग घेत आहे, परंतु गुरुवारी त्याने पाठदुखीची तक्रार केली. त्यानंतर त्याला स्कॅनसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, पाकिस्तानचा संघ या प्रकरणी जोखीम पत्करण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे काही क्रिकेट तज्ञांचे मत आहे. त्यामुळे 28 ऑगस्ट रोजी भारता विरुद्धच्या सामन्यापूर्वी वसीम जर फिट नसल्याचे सिद्ध झाल्यास त्याला विश्रांती दिली जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Asia Cup IND vs PAK)

मोहम्मद वसीम हा पाकिस्तानचा युवा गोलंदाज आहे. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 17 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. दुसरीकडे शाहीन शाह आफ्रिदीच्या जागी मोहम्मद हसनैनचा पाकिस्तानी संघात समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी शाहीन शाह आफ्रिदी पाक संघासोबत युएईला पोहचला आहे. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक शॉन टेट यांच्या मार्गदर्शनाखाली तो फिट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याला काहीच तास शिल्लक राहिले आहेत. अशा परिस्थितीत मोहम्मद वसीमही अनफिट असल्याचे समोर आल्यास पाकिस्तानसाठी हा आणखी एक मोठा झटका असेल. त्याचा स्कॅन रिपोर्ट आल्यानंतरच मोहम्मद वसीमला खेळवायचे की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे. (Asia Cup IND vs PAK)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news