Asia Cup Ind vs Pak : भारत-पाक सामन्यापूर्वी ‘हा’ माजी कर्णधार तुरुंगात जाण्याची शक्यता! | पुढारी

Asia Cup Ind vs Pak : भारत-पाक सामन्यापूर्वी ‘हा’ माजी कर्णधार तुरुंगात जाण्याची शक्यता!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2022 India vs Pakistan : पाकिस्तानी संघातील खेळाडूंची प्रतिमा क्रिकेट विश्वात नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. माजी क्रिकेटपटू इम्रान खान हे देशाचे पंतप्रधान राहिले आहेत. इम्रान खान हे त्यांच्या बेजबाबदार वृत्तीसाठी ओळखले जातात. क्रिकेटच्या मैदानात गोलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका पार इम्रान खान भेदक मारा करण्यात पटाईत होते. पण आजकाल त्यांनी एका विधानाने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड चालवण्याचे काम केले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यांना तुरुंगाची हवा खावी लागण्याची वेळ आली आहे.

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांची थेट न्यायाधीशांना धमकी..

वास्तविक, पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांनी 1992 साली आपल्या संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इम्रान खान यांनी राजकारणात प्रवेश केला. पुढे ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. मात्र, पंतप्रधान झाल्यानंतर ते आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहिले. त्याचवेळी त्यांनी पुन्हा एकदा एका महिला न्यायाधीशांना धमकी देत वादग्रस्त वक्तव्य केले होते. (Asia Cup 2022 India vs Pakistan)

दरम्यान, इम्रान खान यांचा पक्ष पीटीआयचे नेता शाहबाज गिल यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. गिल यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयाकडे केली. कोर्टाने पोलिसांचा मुद्दा मान्य केला. शाहबाज गिलच्या कोठडीत वाढ करण्याचा निर्णय जिल्हा न्यायालयाच्या वतीने जेबा चौधरी यांनी दिला होता. त्यानंतर इम्रान खान हे चौधरी यांच्यावर संतापले होते आणि त्यांनी महिला न्यायाधिशांना धमकीही दिली. (Asia Cup 2022 India vs Pakistan)

तुरुंगात जाण्याची वेळ…

महिला न्यायाधीशांना धमकावल्याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तुरुंगाची हवा खावी लागू शकते. न्यायाधीशांच्या अवमान प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाने इम्रान यांना नोटीस बजावली आहे. त्याचवेळी, पाकिस्तानी वृत्त वाहिनी जिओ न्यूजनुसार, सिंध उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश शेख उस्मानी यांनी म्हटले आहे की, अवमान प्रकरणात दोषी आढळल्यास इम्रान यांना सहा महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. (Asia Cup 2022 India vs Pakistan)

Back to top button