बेळगाव, पुढारी ऑनलाईन: बेळगाव येथील मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरच्या बॉइज स्पोर्ट्स कंपनीतर्फे कुस्ती क्रीडा विभागात लष्करात भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. ८ ते १४ वयातील मुले यात भरती होऊ शकतात.
२७ ते ३० सप्टेंबर या कालावधित सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर, बेळगाव येथे ही भरती होणार आहे.
या भरती प्रक्रियेत कुस्ती प्रकारातील खेळाडूंना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अन्य राज्यातील तरुणांना संधी मिळणार आहे.
ही भरती प्रक्रियेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, म्हैसूर, गुजरात, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशातील उमेदवार सहभागी होऊ शकतात.
यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता चौथी पास आणि वयोमर्यादा ही ८ ते १४ वर्षे ठेवण्यात आली आहे.
मात्र राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे प्रमाणपत्र किंवा पदक असलेल्या अत्यंत प्रवीण उमेदवारांसाठी वयाचे निकष शिथिल होऊ शकतात.
लष्करात भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांनी आपले आधीचे पदक आणि कुस्ती स्पर्धेत मिळवलेले प्रमाणपत्र जिल्हा स्तरावर तसेच बीएससीच्या कार्यालयात सादर करावे लागेल.
भारतीय क्रीडा प्राधिकरण (एसएआय), क्रीडा वैद्यकीय केंद्र (एसएमसी) आणि बॉइज कंपनी ही निवड प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
या प्रक्रियेत जिल्हा स्तरीय, राज्य स्तरीय किंवा राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विजयी झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.
उमेदवारांनी बीएससीच्या कार्यालयात खालील महत्त्वाची कागदपत्रे सादर करावी.
लष्करात भरती झालेल्या उमेदवारांना इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून मोफत शिक्षण तसेच एससएआयमार्फत कुस्तीचे प्रशिक्षण दिले जाईल.
हेही वाचा: