olive oil : ह्रदयरोग, कर्करोग आणि लहान बाळांची हाडे बळकट करणाऱ्या ऑलिव्ह ऑईलचे फायदे जाणून घ्या

olive oil file photo
olive oil file photo
Published on
Updated on

डॉ. प्राजक्ता पाटील : ऑलिव्ह ऑईलचा (olive oil) आहारातील समावेश आरोग्यदायी असतो. ऑलिव्ह तेलामध्ये फ्लॅवसेनॉईडस स्क्वेलीन आणि पोरीफेनोल्स अँटिऑक्सिडंट असतात जे शरीरातील पेशी नष्ट करणार्‍या फ्री रॅडीकल्सपासून बचाव करतात. हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूंमध्ये कोरड्या त्वचेसाठी हे तेल अत्यंत फायदेशीर ठरते. त्याचा वापर केसांतील कोंडा संपवण्यासाठी होतो. त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी याचा खूप फायदा होतो. शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी या तेलाचा वापर करता येऊ शकतो. आहारात या तेलाचा समावेश केल्यास रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या रोगांवर नियंत्रण मिळवता येते.

हृदयरोग कमी होण्यासाठी :

ऑलिव्ह तेल आहारात मिसळून खाल्ल्यास हृदयाची ताकद वाढते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. ऑलिव्ह तेलाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण वाढते. थोडक्यात ऑलिव्ह तेलाचा आपल्या प्रकृतीसाठी सकारात्मक फायदे आहेत.

स्तनांच्या कर्करोगापासून बचाव :

ऑलिव्ह तेलामध्ये (olive oil) हीड्रोकैटीरोसोल हा घटक असतो त्यामुळे स्तनांच्या कर्करोगापासून बचाव होतो. हीड्रोकैटीरोसोल हे एक प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे असे या घटकाविषयी केलेल्या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे.

त्वचेचा पोत सुधारतो :

ऑलिव्ह तेलामध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आणि अँटिऑक्सिडंट या दोन्ही घटकांचे प्रमाण भरपूर असते. त्वचेवर असलेले काळे डाग ऑलिव्ह तेल लावल्याने जातात आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. मात्र, अंगाला लावायचे आहे म्हणून सुद्धा हे तेल गरम करू नये; अन्यथा त्या तेलातील पोषक घटक नष्ट होतात.

वजन घटवते :

ऑलिव्ह तेलाचा वापर रोज करणे कदाचित शक्य होणार नाही कारण हे तेल खूप महाग असते. मात्र, या तेलाचा वापर आहारात केल्यास अतिरिक्त वजनाची समस्या दूर होऊ शकते. कारण तेल किंवा लोणी यांसारखे ट्रान्सफॅट ऑलिव्ह तेलात नसते.

सुरकुत्यांवर फायदेशीर :

ऑलिव्ह तेल शरीरातील फ्री रॅडिकल्सवर परिणाम करते त्यामुळे वयोवृद्धीच्या खुणा कमी करते. लिंबाच्या रसात ऑलिव्ह तेलाचे काही थेब मिसळून आठवड्यातून तीन वेळा चेहर्‍याला मालिश करावी त्यामुळे चेहर्‍यावरील सुरकुत्या निघून जातील. चेहर्‍यावर सुरकुत्या असतील तर ऑलिव्ह तेल, चंदन पावडर यांचे मिश्रण बनवून ते चेहर्‍यावर लावावे. त्याव्यतिरिक्त ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब फेसपॅकमध्ये मिसळून लावल्यास एक महिन्यात सुरकुत्या जाण्यास मदत होते.

उत्तम हेअर कंडिशनर :

आपले केस कोरडे झाले असतील ऑलिव्ह तेलासारखा उत्तम पर्याय नाही. केसाला ऑलिव्ह तेल लावल्याने केसाला उत्तम कंडिशनिंग होते. थोडेसे ऑलिव्ह तेल तळहातावर घेऊन ते केसाला चोळावे त्यामुळे केस मुलायम आणि सिल्की होतात. कोंड्याची समस्या सेल तर ऑलिव्ह तेलामुळे कोंडा कमी होतो.

मधुमेहावर नियंत्रण :

ऑलिव्ह तेल मधुमेही आणि मधुमेह होण्याची शक्यता असणार्‍या रुग्णांना आहारात घेण्यास सांगितले जाते.

संशोधन अभ्यासानुसार मधुमेहाच्या रोग्यांनी ऑलिव्ह तेलात शिजवलेला आहार घ्यायला हवा.

मधुमेही रुग्णांना ट्रायग्लिसराईडमुळे हृदयविकार होण्याची शक्यता बळावते. ऑलिव्ह तेल या ट्रायग्लिसराईडची पातळी कमी करू शकते.

वेदना कमी करण्यास सहायक :

ऑलिव्ह तेलातील ऑलियोकेथल या घटकांमध्ये वेदनाशामक गुण असतात.

ब्रुफेन नावाची वेदनाशामक गोळी ज्या पद्धतीने काम करते तसेच कार्य ऑलियोकेथल करते.

ऑलिव्ह तेल नैसर्गिकपणे संधीवातातील सुजेमुळे होणार्‍या वेदना कमी करते.

हिमोग्लोबीनसाठी उपयुक्त :

ऑलिव्ह तेलामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते जे हिमोग्लोबीनसाठी आवश्यक घटक आहे.

हिमोग्लोबीन एक प्रथिन आहे जे रक्तामधून शरीरात ऑक्सिजन वहनाचे काम करते. लोहामुळे एन्झाईमची निर्मिती होण्यासही मदत होते.

एन्झाईम प्रतिकारक शक्तीची प्रणाली योग्यप्रकारे कार्यरत ठेवण्यास जबाबदार असते.

पोटातील अल्सरला प्रतिबंध :

ऑलिव्ह तेलमध्ये जीवाणू प्रतिबंधक गुण असतात त्यामुळे अल्सर होण्यास कारणीभूत जीवाणूंशी दोन हात करण्यास मदत होते.

अभ्यासानुसार पोलीफिनोल्स अल्सरला कारणीभूत ठरणार्‍या जीवाणूंच्या विरोधात सुरक्षा देण्यास ऑलिव्ह तेलाचा फायदा होतो.

पचनास मदत :

1 कप ऑलिव्ह तेल आपल्या दैनंदिन तंतुमय पदार्थांची 17 टक्के गरज पूर्ण करते. जेणेकरून जेवण पचण्याची क्रिया सुलभ होते. पचनक्रिया योग्य राखण्यास मदत करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news