मूत्राशयाच्या संसर्गाची समस्या पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये होण्याचे कारण काय? | पुढारी

मूत्राशयाच्या संसर्गाची समस्या पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये होण्याचे कारण काय?

डॉ. मनोज शिंगाडे

मूत्राशयाच्या संसर्गाला सायस्टिसिस म्हटले जाते आणि ब्लॅडर किंवा मूत्राशयाला येणारी सूज ही बहुतकरून महिलांमध्ये आढळून येणारी समस्या आहे. मात्र, पुरुषांमध्ये ही समस्या पाहायला मिळत नाही. क्वचित काही वेळा पुरुषांना हा त्रास झाल्याचे पाहिला मिळते.

अर्ध्याहून अधिक महिलांना आयुष्यात कधी ना कधी तरी मूत्राशयाच्या संसर्गाने ग्रस्त होतात, असा एक अंदाज व्यक्त केला जातो; पण पुरुषांमध्ये ही समस्या आढळून येत नाही पण वाढत्या वयात हा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो.

हा संसर्ग अंडकोषाच्या आकारात वाढ झाल्यामुळे होतो. अर्थात पुरुषांपेक्षाही महिलांमध्ये संसर्ग होण्याचे काय कारण असावे हे शोधण्यात डॉक्टरांनाही यश आलेले नाही.

डॉक्टरांच्या मते पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मूत्रमार्ग लहान आहे. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. महिलांमध्ये मूत्रमार्ग अतिशय लहान म्हणजे जवळपास दीड इंचाचा असतो. त्यामुळे तिथे जीवाणूंचे संक्रमण होण्याचे प्रमाण अधिक असते. ज्येष्ठ नागरिकांना अतिथकवा आणि मानसिक त्रासही असतो. त्यामुळे मूत्राशयाचे संक्रमण अधिक गंभीर असू शकते. ताप किंवा थंडी वाजणे याचा अर्थ मूत्रमार्गाच्या संसर्गाचा परिणाम मूत्राशयावर झालेला असू शकतो.

डॉक्टरी सल्ला केव्हा घ्याल –

आपल्याला मूत्रमार्गाचे संक्रमणाची लक्षणे दिसली की.
काही वेळा औषधोपचारानंतर पुन्हा संसर्गाची लक्षणे दिसून येतात.

लघवी करताना वेदना तसेच ताप, उलट्या, थंडी भरणे आणि कंबर किंवा पोटदुखी. ही सर्व लक्षणे असतील तर मूत्राशयाच्या संसर्गामुळे मूत्रपिंडावर परिणाम झाला आहे. याचाच अर्थ असा की, प्रोस्टेट ग्रंंथीवरही याचा प्रभाव झाला आहे किंवा मूत्रपिंडाचा ट्यूमर झाला आहे.

या परिस्थितीत त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लघवी करताना जळजळ होणे, लैंगिक रोग, पेल्विक इंफ्लेमेटरी आजार किंवा इतर काही गंभीर संसर्गांची लक्षणे असू शकतात. तेव्हा वेळ न दवडता डॉक्टरांकडे तपासणी करून घ्यावी.

मूत्राशयाच्या संसर्गात व्यक्तीला मलमूत्र विसर्जनावेळी जळजळ होते. हे मूत्राशयाच्या संसर्गाचे सामान्य लक्षण आहे. लघवीचे प्रमाण वाढते, लघवीची तीव्र भावना होऊनही पूर्णपणे लघवी न करता येणे, लघवीला तीव्र दुर्गंध येतो, लघवीचा रंग लाल किंवा काळसर येतो, मूत्राशय आकुंचित होते.

Back to top button