दुधाचा चहा पिताय? या गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना | पुढारी

दुधाचा चहा पिताय? या गंभीर आजारांचा करावा लागू शकतो सामना

पुढारी ऑनलाइन डेस्क: घरी पाहुणा आला तर पहिला पाहुणचार असतो तो चहा… बाहेर पाऊस पडू लागला की चहाची तल्लफ येते…मित्र भेटला की चहा…असे चहा आणि आपले नाते जवळचे आहे. मात्र, वारंवार दुधाचा चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते.

दुधाचा चहा पिणे हा आंतरराष्ट्रीय शिष्टाचार मानला जातो. चहाचे अनेक प्रकार असले तरी दुधाचा चहा लोकप्रिय आहे.

हा चहा तयार करण्याचे प्रकारही अनेक आहेत. मसाला चहा, जिंजर टी, इलायची टी, तंदूर चहा असे अनेक प्रकार प्रचलित आहेत.

संबंधित बातम्या

मात्र, जर तुम्ही रोज आणि अधिक वेळा दुधाचा चहा पित असाल तर शरीरावर साईड इफेक्ट होण्याची शक्यता आहे.

झोपेचे होऊ शकते खोबरे

तरतरी यावी म्हणून आपण नेहमी चहा पितो. ऑफिसमध्ये कंटाळा आला की, चहा मागवला जातो. अनेकांना सिगारेटबरोबर चहा पिण्याची सवय असते.

मात्र, ही सवय धोकादायक ठरू शकते. चहामध्ये ४७ मिलिग्राम कॅफिन असते. त्यामुळे आपल्या झोपेचे खोबरे होऊ शकते.

निद्रानाशासारखे आजार होण्याची शक्यता असते.

दुधाचा चहा पिल्याने १५ मिनिटांनी कॅफिन रक्तात मिसळते आणि तरतरी येते. मात्र, त्यामुळे जर झोपण्याआधी तुम्ही चहा पित असाल तर लवकर झोपण्याचे स्वप्न पाहू नका.

संध्याकाळी तुम्हाला दुधाचा गरम चहा छान वाटू शकतो. मात्र, रात्री तुम्हाला अस्वस्थ करू शकतो.

वजन कमी करण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांना धोका

चहामध्ये खूप कमी कॅलरी असतात मात्र, त्यात अशी रसायने असतात की त्याचा उपयोग उर्जेची मात्रा वाढविण्यासाठी त्याची ओळख आहे.

कमी कॅलरीचे हे पेय वास्तवात तुमच्या कॅलरी बर्न करण्याचे काम करण्यास मदत करू शकते.

टी रिसर्च असोसिएशन इन इंडिया यांच्याद्वारे केलेल्या अभ्यासानसार जेव्हा चहात दूध मिसळले जाते तेव्हा दुधातील प्रोटीन चहातील संयुगांमध्ये मिसळते तेव्हा वजन वाढण्याची शक्यता असते.

दुधाच्या चहामुळे चयापचय क्रीया मंदावते. त्यामुळे जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर हे तुमच्यासाठी योग्य पेय नाही.

वारंवार चहा पिणे योग्य नाही

दिवसातून अनेकदा चहा पिणे आरोग्यासाठी हानीकारक असू शकते. चहाच्या पानांमध्ये टॅनिन असते. त्यात उच्च आम्लीय कंटेन असतो.

रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात चहा पिला तर टॅनिन तुमच्या आतड्यांना इजा करू शकते. त्यामुळे तुम्हाला पोटदुखी होऊ शकते.

पोटात मुरडा मारून कळ येऊ लागली तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू शकते.

नैराश्य वाढवू शकते

दररोज दुधाचा चहा पिने किंवा त्यासोबत काहीतरी खाणे हा आपल्या दिवसाचा आरामदायी शेवट असू शकतो.

मात्र, संशोधनानुसार स्वादिष्ट पेय पिल्याने नैराश्यात वाढ होऊ शकते. हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये झालेल्या संशोधनानुसार चहामध्ये असलेले कॅफिन सेवन केल्याने माणूस चिडचिडा होतो.

तुम्ही चिंताक्रांत असाल तर तुमच्या शरीराला तसेच तयार करण्याची प्रकिया सुरू राहू शकते. कॅफिनमुळे ह्रदयगतीही वाढू शकते. त्यामुळे अस्वस्थ वाटू शकते.

टाइप २ चा मधुमेह वाढू शकतो

तुम्ही जर दररोज भरपूर चहा पित असाल तर तुम्हीच विचार करा की, चहात किती साखर घातली असेल.

खूप प्रमाणात चहा पिल्याने आणि त्यावाटे साखरेचे सेवन केल्याने रक्तात साखर वाढू शकते.

त्यामुळे तुम्हाला टाइप २ मधूमेह होऊ शकतो. साखरेचे प्रमाण वाढल्याने अन्य आजारही वाढू शकतात.

हेही वाचा: 

Back to top button