बंगळुरु; पुढारी ऑनलाईन : कन्नड अभिनेत्री जयंती यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. कन्नड अभिनेत्री जयंती यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि ख्यातनाम अभिनेत्री म्हणून ख्याती होती.
अधिक वाचा –
बंगळुरू येथील राहत्या घरात झोपेत असतानाचं त्यांचा मृत्यू झाला होता. जयंती यांचा मुलगा कृष्ण कुमार यांनी हे वृत्त दिले आहे.
अधिक वाचा –
त्यांनी त्यांच्या सिने करिअरमध्ये अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत.
जानेवारी १९४५ रोजी बल्लारी येथे जयंती यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बालासुब्रमण्यम इंग्रजीचे प्राध्यापक होते.
अधिक वाचा –
कमला कुमारी म्हणजेच जयंती यांनी 'जेनु गुडू' तून आपल्या चित्रपट करिअरला सुरुवात केली होती.
अभिनेते राजकुमार यांच्यासोबत त्यांनी ४० हून अधिक चित्रपट केले होते.
त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेत चित्रपट केले आहेत. त्यांना सात वेळा कन्नड फिल्मफेयर पुरस्कार आणि दो वेळा फिल्मफेयर पुरस्कार (दक्षिण) याने सन्मानित करण्यात आले होते.
अधिक वाचा –
पाहा व्हिडिओ – पालखी सोहळा हा महाराष्ट्राचं सांस्कृतिक वैभव | Ashadhi Vaari Special : With Dr. Sadanand