कोल्हापूर : प्रापंचिक साहित्याचा झाला कचरा; पूरग्रस्त हतबल, मदतीची आस | पुढारी

कोल्हापूर : प्रापंचिक साहित्याचा झाला कचरा; पूरग्रस्त हतबल, मदतीची आस

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पंचगंगा नदीलगतच्या भागाला पुराचा मोठा फटका बसला आहे. पाणी उतरल्याने स्थलांतरित नागरिक घरी परतत आहेत. स्वच्छतेची लगबग सूरु झाली आहे. घरातील धान्य, फर्निचर, कपडे यांचा अक्षरशः कचरा झाला आहे. त्यामुळे पुरबधित हवालदिल बनले आहेत.

२०१९ च्या तुलनेत यंदा पाणी पातळी अधिक वाढल्याने नुकसानीत भर पडली आहे. मागील पुराचा अनुभव असणारे अनेक जण वेळीच स्थलांतरित झाले होते. तथापि, घरातील सर्व साहित्य हलविणे शक्य झाले नाही. पुराचे पाणी मागे गेल्याने लोक घरी परतले आहेत.

औषध फवारणी

पुराच्या पाण्यासोबत आलेला कचरा, सांडपाणी घरात गेले होते. घराची स्वच्छता यासह रोगराई पसरू नये यासाठी औषध फवारणी सुरू करण्यात आली आहे.

कोल्हापूर महापूर अपडेट : राधानगरी धरणाचा केवळ एक दरवाजा सुरु

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज दुपारी २:०० वाजताच्या ताज्या आकडेवारीनुसार राजाराम बंधारा पाणी पातळी ४८ फुट ३ इंच इतकी आहे.

पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट व धोका पातळी ४३ फूट आहे. जिल्ह्यातील एकुण पाण्याखालील बंधारे ७६ आहेत. दुसरीकडे राधानगरी धरणाचे 3 दरवाजे बंद झाले आहेत. सध्या केवळ एक स्वयंचलित दरवाजा सुरु आहे.

Back to top button