Uncategorized

‘ही’ चार नावे वगळून राज्यपालनियुक्त विधानपरिषद आमदारांची नियुक्ती?

backup backup

‍मुंबई, पुढारी ऑनलाईन: विधानपरिषद मधील १२ आमदारांची नियुक्ती करण्यावरून सध्या राज्यात वाद सुरू आहे. आज महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहे. मात्र, या यादीतील चार नावांवर आक्षेप घेण्यात आला असून ती नावे बदलल्यास यादी फायनल होण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेच्या १२ रिक्त जागांची लवकर नियुक्ती करावी अशी मागणी वारंवार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. १५ ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री आग्रह धरत नाहीत, असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नेते भेट घेणार होते. मात्र, आता ठाकरे यांच्याऐवजी अन्य नेते भेट घेतील.

राज्यपाल नियुक्त जागांबाबत नियुक्तीचा वाद कोर्टापर्यंत गेला. मात्र आता ही १२ जणांच्या नावाची यादी काही दिवसांत जाहीर होईल, अशी चर्चा सध्या सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते.

परंतु आज उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे.

मंत्रीमंडळाने पाठविलेल्या १२ नावांमधली काही नावांवर कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. यात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे, सचिन सावंत, नितीन बानुगडे आणि यशवंत भिंगे यांच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे.

नावे वगळण्याची तयारी

१२ जणांच्या यादीतील आक्षेप घेतलेली नाव वगळण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारने केली आहे.

राज्यपालांसोबत होणाऱ्या चर्चेत जर राज्यपालांनी १२ नावांपैकी काही नावांवर आक्षेप आहे असे सांगितल्याचे समजते.

विधानपरिषद आमदारांची नियुक्ती वर महाविकास आघाडी या नावांवर ठाम राहिली तर राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष पुढील काळात सुरू राहील.

१२ नावांची यादी कोणती?

  • काँग्रेस : सचिन सावंत(सहकार आणि समाजसेवा), मुझफ्फर हुसैन(समाजसेवा), रजनी पाटील, अनिरुद्ध वणकर
  • राष्ट्रवादी काँग्रेस : एकनाथ खडसे(सहकार आणि समाजसेवा), राजू शेट्टी (सहकार आणि समाजसेवा), प्रा. यशपाल भिंगे (साहित्यिक), आनंद शिंदे(कला)
  • शिवसेना : उर्मिला मातोंडकर (कला), नितीन बानगुडे-पाटील (साहित्यिक), विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी

या नावांना आक्षेप

  • सचिन सावंत, काँग्रेस
  • एकनाथ खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस
  • यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेस
  • नितीन बानगुडे पाटील, शिवसेना

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT