भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंडमध्ये ५ सामन्यांची मालिका खेळत आहे. यात रोहित शर्माने चांगली फलंदाजी करत सर्वांचेच लक्ष वेधले. काही काळापूर्वी कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी झगडत असलेल्या रोहित शर्माने आता कोसटी संघात सलामीवीर म्हणून आपली जागा पक्की केली.
आता रोहितने नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकत पाचवे स्थान पटकावले आहे. तर तीन कसोटीत सलग तीन शतके ठोकणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. त्याने केन विल्यमसनला दुसऱ्या स्थानावर ढकलले.
भारताचा कर्णधार विराट कोहली इंग्लंडमध्ये मोठ्या धावा करण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. ५० डाव उलटून गेले तरी विराटच्या बॅटमधून अजूनपर्यंत शतक आलेले नाही. या त्याच्या सुमार फलंदाजीचा परिणाम त्याच्या टेस्ट रँकिंगवरही झाला असून तो पहिल्या पाचमधील यादीतून बाहेर फेकला गेला आहे. त्याला या यादीतून दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने बाहेर फेकले.
विराट कोहली टेस्ट रँकिंगमध्ये नोव्हेंबर २०१६ पासून पहिल्यांदाच पहिल्या पाचातून बाहेर फेकला गेला आहे. तर विराट कोहलीने पहिल्यांदाच टेस्ट रँकिंमध्ये पहिल्या पाचात स्थान मिळवले आहे. रोहित शर्माने हेडिंग्ले कसोटीत पहिल्या डावात १९ तर दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी केली होती.
याच हेडिंग्ले कसोटीत चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात ९१ धावांची झुंजार खेळी केली होती. या खेळीमुळेच त्याने आपले टेस्ट रँकिंग तीन स्थानांनी सुधारले आहे. आता तो १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
रोहित शर्माने ७७३ गुण मिळवत टेस्ट रँकिंगमध्ये पाचवे स्थान पटकावले तर ७६६ गुण असलेला विराट कोहली सहाव्या स्थानावर घसरला आहे. या यादीत इंग्लंडच्या जो रुटने ९१६ गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले. त्याने केन विल्यमसनला ( ९०१ ) मागे टाकले. या यादीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८९१ गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलियाचाच लॅम्बुश्ने ८७८ गुण मिळवत चौथ्या स्थानावर विराजमान आहे.
हेही वाचले का?