माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी घेतली सरसंघचालक भागवत यांची भेट | पुढारी

माजी सरन्यायाधीश बोबडे यांनी घेतली सरसंघचालक भागवत यांची भेट

नागपूर, पुढारी ऑनलाईन: आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांची माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भेट घेतली. बोबडे यांनी आरएसएसच्या मुख्यालयात जाऊन भागवत यांची तासभर भेट केली. औपचारिकपणे भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.

बोबडे आणि भागवत यांच्यातील भेटीचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. तसेच आरएसएसच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देण्यास नकार दिला.

महल परिसरातील आरएसएस मुख्यालयात मंगळवारी संध्याकाळी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान बैठक झाली.

मोहन भागवत किंवा माजी सरन्यायाधीश बोबडे या दोघांकडूनही या बैठकीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी संघाचे संस्थापक के. बी. हेडगेवार यांच्या जुन्या घरालाही भेट दिली.

शरद बोबडे यांनी भेट दिलेल्या घरात हेडगेवार यांचा जन्म झाला होता.

शंभर वर्षांपेक्षा जास्त जुण्या घराची काळजी कशाप्रकारे घेतली जात आहे, याबद्दल बोबडे यांनी जाणून घेतली.

बोबडे मूळचे नागपूरचे

माजी सरन्यायाधीश बोबडे हे मूळचे नागपूरमधील आहेत. बोबडे यांनी अनेक वर्षे नागपूरमध्ये वकिली केली होती.

बोबडे यांचे कुटुंबीय नागपुरात राहतात. न्यायमूर्ती रमणा यांच्याकडे सूत्रे सोपवून ते सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाले.

बोबडेंनी दिला आहे राम मंदिर प्रकरणाचा निकाल

माजी मुख्य सरन्यायाधीश बोबडे यांनी आयोध्या प्रकरणाचा निकाल दिला होता. भाजपचा अजेंडा असलेल्या राममंदिराचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला होता.

बोबडे यांच्याआधी असलेले सरन्यायाधीश यांनीही भाजपशी सबधित असलेल्या अनेक प्रकरणांचा निकाल दिला होता. ते निवृत्त होताच त्यांना राज्यसभेचे सदस्यत्व दिले होते.

हेही वाचा: 

Back to top button