‘मी जग सोडून जातोय,’; मुलाला फोन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

‘मी जग सोडून जातोय,’; मुलाला फोन करून शेतकऱ्याने केली आत्महत्या

जळगाव, पुढारी ऑनलाईन: 'मी जग सोडून जातोय' असा फोन आपल्या मुलाला करत बोरखेडा येथील शेतकऱ्याने आत्महत्या केली. घरचे लोक झोपल्यानंतर मंगळवारी मध्यरात्री आत्महत्या केली. कैलास धनसिंग पाटील (वय ५५) असे त्यांचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, धरणगाव तालुक्यातील बोरखेडा येथील कैलास धनसिंग पाटील (५५) वर्षीय शेतकरी राहत होते.

ते मध्यरात्री दीडच्या सुमारास घरातील सर्वजण झोपल्याचे पाहून ते घराबाहेर पडले.

त्यानतर रात्री पावणे तीनच्या सुमारास त्यांनी आपल्या मुलासह जवळच्या चार नातेवाईकांना फोन करून 'मी जग सोडून जातोय' असे सांगितले.

यामुळे घरचे घाबरून जागे झाले. तसेच नातेवाईकही तत्काळ घराजवळ आले. त्यांनी बॅटरी घेऊन प्रकाशझोतात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पाटील यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

घराशेजारी असलेल्या पाटील यांच्या शेतात कडुलिंबाचे झाड असून तेथे त्यांनी गळफास घेतला.

नातेवाईकांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

दरम्यान, कैलास पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news