मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार, १२ आमदारांच्या यादीवर कंडका पडणार? | पुढारी

मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार, १२ आमदारांच्या यादीवर कंडका पडणार?

मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही भेट अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या १२ आमदारांच्या नियुक्ती संदर्भात असल्याचे बोलले जात आहे.

मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणार : १२ आमदारांचे काय होणार

त्यामुळे या भेटीतून एकदाचा कंडका पडणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री सायंकाळी साडे सात वाजता महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांसह भेट घेणार आहेत.

ही भेट होण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुजोरा दिला होता. त्यामुळे या भेटीनंतर राज्यपाल यादीवर काय निर्णय घेणार? याची उत्सुकता आहे.

मुख्यमंत्री आज राज्यपालांना भेटणारभेट नाकारल्याचा आरोप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना भेट नाकारली असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. मात्र ही राजकीय वावडी असल्याचे स्पष्ट झाले. राज्यपालांनी राज्य सरकारला १ सप्टेंबरची वेळ भेटीसाठी दिली होती. त्यानुसार आज ही भेट होत आहे.

राज्यातील महविकास आघाडी सरकारने विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नावांची केलेली शिफारशींची फाईल गेले अनेक महिने राजभवनावर प्रलंबित आहे.

त्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महसूल मंत्री राज्यपालांना भेटणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील आठवड्यात गुरुवारच्या बैठकीत म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने राज्यपालांची वेळ घेतली नव्हती.

तसेच मुख्यमंत्र्यांच्या गुरुवारच्या कार्यक्रमातही या भेटीची नोंद नव्हती. राज्य सरकारकडून राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली नव्हती, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले.

हे ही वाचलं का?

Back to top button