नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात किरकोळ तेजी दिसून आली. मात्र, चांदीच्या दरात घसरण झाली. सोन्याच्या दरात ४८ रुपयांनी वाढ होऊन ते ४७,२८७ रुपयांवर (प्रति १० ग्रॅम) पोहोचले. तर चांदी किलोमागे ४४५ रुपयांनी स्वस्त झाली. (Gold Rate Today)
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, (Gold Rate Today १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) बुधवारी १ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,२८७ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,०९८ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,३१५ रुपये, १८ कॅरेट ३५,४६५ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,६६३ रुपये होता. तर चांदीचा प्रति किलो भाव ६२,९५७ रुपये होता.
मंगळवारी (दि.३१) सायंकाळच्या अपडेटनुसार २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,२३९ रुपये होता. त्यात आज गुरुवारी किरकोळ तेजी दिसून आली.
२४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात.
२४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.
दरम्यान, डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत होत असल्याने त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. एमसीएक्सवर गोल्ड फ्यूचर्स प्रति १० ग्रॅम ४७,०९५ रुपयांवर व्यवहार करत होते. सिल्वर फ्यूचर्समध्ये देखील ०.३३ टक्के घसरण दिसून आली. यामुळे चांदीचा दर प्रति किलो ६३,१५६ रुपये होता.
दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर स्थिर आहेत. स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस १,८१३ डॉलर होता. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम).