लोणंद येथे कीर्तनाचा कार्यक्रमात जमलेली गर्दी. 
Uncategorized

किर्तन आयाेजित करुन गर्दी केल्याप्रकरणी ९ जणांवर गुन्हा

backup backup

नातेपुते; पुढारी वृत्तसेवा : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील लोणंद येथे कीर्तन कार्यक्रम ठेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी जमवल्या प्रकरणी 'चांडाळ चौकडीच्या करामती' या मराठी वेबसिरीज मधील कलाकार भरत शिंदेसह ९ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे परिसरातील गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत नातेपुते पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कोरोना संसर्गामुळे माळशिरस तालुक्यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम यांना प्रतिबंध आहेत. लोणंद येथील खताळ वस्तीवर तानाजी आबा खताळ यांच्या शेतात किर्तन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

त्याठिकाणी मराठी वेबसिरीज चांडाळ चौकडीच्या करामती यावेबसिरीज मधील कलाकार ह.भ.प. भरत शिंदे उर्फ बाळासाहेब यांच्या कीर्तन च्या कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र दगडु रूपनवर, संदिप राजेंद्र रूपनवर, रघुनाथ हिम्मत रुपनवर, बापुराव ब्रम्हचारी रुपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ व दादासो शंकर शेंडगे रा. कन्हेर यांनी केले होते. त्याठिकाणी ७०० ते ८०० लोकांची गर्दी जमवल्याचे निदर्शनास आल्यानंतर लोणंद गावचे तलाठी संजय गोरे यांनी नातेपुते पोलिसात फिर्याद दिली.

गुन्हा दाखल

माळशिरस तालुका तहसीलदार यांच्या आदेशानुसार लोणंदचे गाव कामगार तलाठी संजय गोरे यांच्या फिर्यादेवरुन नातेपुते पोलिस ठाण्यात तानाजी आबा खताळ, राजेंद्र दगडु रुपनवर, संदिप राजेंद्र रूपनवर, रघुनाथ हिम्मत रुपनवर, बापुराव ब्रम्हचारी रूपनवर, दादा महादेव खताळ, किसन दशरथ होळ सर्व रा. लोणंद ता.माळशिरस दादासो शकर शेंडगे रा, कन्हेर ता. माळशिरस भरत शिंदे उर्फ बाळासाहेब रा. कांबळेश्वर ता. बारामती यांचे विरुध्द भा.द.वि. कलम १८८, २६९, २७०४ आपत्ती व्यावस्थापन कायदा कलम ५१ (४) साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम २३४ महाराष्ट्र पोलिस अधि. कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि मनोज सोनवलकर यांच्यासह पोहेक हांगे, पोना माने, पोकॉ. जानकर,पोकॉ. घाडगे या पथकाने ही कारवाई केली.

हे ही वाचलत का

हे पाहा :

फुकट बिर्याणी मागविणाऱ्या महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची होणार चौकशी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT