बीजिंग; पुढारी ऑनलाईन : चीनमध्ये पावसाने हेनान आणि झेंगझोऊ प्रांतात कहर केला आहे. चीनमध्ये पावसाने आतापर्यंत २५ नागरिकांचा बळी घेतला आहे. सलग तीन दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे दाेन्ही प्रांतातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. तर शेकडो जण बेपत्ता आहेत. मेट्रो सेवाही पूर्णपणे कोलमडली असून भुयारी रेल्वेत पाणी शिरल्याने १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. पावसाचा फटका १२ लाखांहून अधिक नागरिकांना बसला आहे. २ लाखांहून अधिक जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
अधिक वाचा
चीनमधील हेनान प्रांताला मुसळधार पावासाने झोडपले. सलग भागामध्ये पाणी साचल्याने जनजीनव कोलमडले आहे. एक लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. हेनान प्रांतात एक हजार वर्षांमधील रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली आहे.
अधिक वाचा
चीनमधील सरकार वृत्तसंस्था 'शिन्हुआ'ने दिलेल्या माहितीनुसार, हेनान प्रांतत रेकार्ड ब्रेक २०१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर झेंगझोऊ नगरामध्ये ४५७.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. रस्ते मार्ग ठप्प झाले आहेत. तर हवाई मार्गाची वाहतूक बंद केली आहे. १०० हून अधिक मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
पावसाचे पाणी उपनगरांमधील सुरुंगामध्ये गेले. यामुळे शेकडो लोक मेट्रो ट्रेन सेवेतच अडकले. मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने १२ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.हेनान प्रांततातील १४ हून अधिक शहरे जलमय झाली आहे. मेट्रोमध्ये पाणी शिरल्याने शेकडो प्रवासी अडकले . त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी अआपत्ती व्यवस्थापनाने युद्धतापळीवर काम सूरु केले.
मुसळधार पावसामुळे झेंगझोउडोंग रेल्वे स्थानकावरील १६९ हून अधिक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर शहरातील २६० विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे स्थानिक प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
मुसळधार पावसामुळे अनेक शहरांमधील वीज सेवा खंडित करण्यात आली आहे. तसेच पाणीपुरवठा व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. हेनान आणि झेंगझोऊ प्रांतातमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हेनान प्रांतातील नद्यांना पूर आल्याने मदतकार्यासाठी लष्कराला पाचरण करण्यात आले आहे. तर झेंग्झोऊडोंग रेल्वे स्थानकावर १६०हून अधिक रेल्वे गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.
हेही वाचलं का?