Latest

आमदार नितेश राणे यांच्या जामिनाबाबत….

backup backup

सिंधुदुर्ग; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचा कणकवलीतील कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबत उद्या सुनावणी होणार आहे. तब्बल चार तास याबाबत सुनावणी झाली. त्यानंतर कोर्टाने उद्या सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले नितेश हे वडील नारायण राणे यांच्यासोबत सिंधुदुर्गात उपस्थित झाले.

दरम्यान राणे यांचे विधानसभेतूनही निलंबन करावे यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार आक्रमक झाले होते.
नितेश यांचे संशयित म्हणून नाव घेतल्यानंतर ते 'नॉट रिचेबल' असून, त्यांनी आपल्याला अटक होऊ नये यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. नितेश राणे यांचे वडील केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सोमवारी नागपुरातील सर्व कार्यक्रम रद्द करून कोकणात परतले. गोवा विमानतळावर नितेश आणि दोघे भेटल्यनंतर नारायण राणे यांनी 'नितेश राणे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, त्यामुळे ते अज्ञातवासात जाण्याचे कोणतेही कारण नाही,' असे स्पष्ट केले होते.

दरम्यान सुनावणीवेळी सिंधुदुर्ग कोर्टाच्या आवारात सेना आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही बाजुंनी मोठ्या संख्येने वकिलांची फौज उभा करण्यात आली. यावेळी राणे यांच्या वकिलाने 'ज्यावेळी संतोष परब यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी ते स्वत: तेथे उपस्थित नव्हते असे सांगत जामीन द्यावा अशी विनंती केली.'

राणे यांच्या वकिलांनी कागदपत्रे कोर्टाला सादर केली. परब हल्ला प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजही सादर करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 30 डिसेंबर रोजी मतदान आणि 31डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडीच्या पॅनेलचे नेतृत्व करणारे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर 18 डिसेंबर रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. सतीश सावंत यांनी हा हल्ला राणे यांनीच घडवून आणला, असा आरोप केला होता. संतोष परब यांनीदेखील आपल्या फिर्यादीत नितेश राणेंचे नाव नमूद केले होते.

दरम्यान, पोलिसांनी पुणे भागात राहणार्‍या पाचजणांना यापूर्वी अटक केली होती. आणखी सहावा आरोपी रविवारी सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीत अटक केला आहे. त्याचे नाव सचिन सातपुते आहे, असे सांगितले जाते. सचिन सातपुते हा पुणे भागातील असून तो राणे यांच्या स्वाभिमान संघटनेचा कार्यकर्ता आहे, आणि तो भाजपकडून पुण्यामध्ये निवडणुकीत उतरला होता, असे सांगितले जाते.

याप्रकरणी कणकवली पोलिसांनी नितेश यांना चौकशीसाठी बोलावले होते. सातपुते याला अटक केल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज कोर्टात राणे यांच्या बाजुने युक्तिवाद करण्यात आला. वकिलांनी तपासाची कादपत्रे सादर केली. उद्या सरकार पक्षातर्फे वकील युक्तिवाद करणार आहेत.

राणे नॉट रिचेबलच..

नितेश राणे रविवारी रात्रीनंतर 'नॉट रिचेबल' होते. सोमवारी अधिवेशनालाही ते उपस्थित नव्हते. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात याप्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यांचे वकील अ‍ॅड. संग्राम देसाई यांनी हा अर्ज दाखल केला होता. दरम्यान नितेश राणे हे नॉट रिचेबल आहेत.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT