आश्चर्यच! पक्षाघात झालेल्या आजोबांनी मेंदूतील चीपने केले ट्वीट | पुढारी

आश्चर्यच! पक्षाघात झालेल्या आजोबांनी मेंदूतील चीपने केले ट्वीट

आश्चर्यच! पक्षाघात झालेल्या आजोबांनी मेंदूतील चीपने केले ट्वीट

मेलबर्न : पुढारी ऑनलाईन : ऑस्ट्रेलियात पॅरालेसिस (पक्षाघात) झालेल्या ६० वर्षांच्या एका आजोबांनी निव्वळ विचारांनी ट्वीट केले आहे. मेंदूत बसवलेल्या एक लहान चिपच्या मदतीने ते हे ट्वीट करू शकले आहेत. 

फिलिप ओ किफ असे त्यांचं नाव आहे. पक्षाघातामुळे त्यांना हाताची हालचाल करता येत नाही. 

‘No need for keystrokes or voices. I created this tweet just by thinking it.’ #helloworldbci असे ट्विट त्यांनी केलेले आहे.

२०१५पासून त्यांना पक्षाघाताचा त्रास आहे, त्यामुळे त्यांच्या शारीरिक हालचालींवर बंधनं आलेली आहेत. 

कॅलिफोर्नियात कार्यरत असलेली कंपनी Synchron या प्रकारच्या चीप आणि इंटरफेस बनवण्यासाठी काम करत आहे. न्यूरोव्हॅस्क्युलर बायोइलेक्ट्रॉनिक अशा स्वरूपाचं काम ही कंपनी करते. निव्वळ विचारांच्या माध्यमातून काँप्युटर कसा हाताळता येईल, याचे संशोधन ही कंपनी करत आहे. 

शारीरिक हालचालींवर मर्यादा असलेल्या रुग्णांसाठी हे तत्रज्ञान वरदान ठरू शकणार आहे.

फिलिप्स म्हणाले, “जेव्हा मी पहिल्यांदा याबद्दल ऐकले तेव्हा मला नव्याने स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटले. सुरुवातीला थोडे शिकावं लागते. पण नंतर अगदी सोपे होऊन जाते.”

२०२०मध्ये त्यांना हा ब्रेन काँप्युटर इंटरफेस बनवण्यात आला.  कंपनीचे सीईओ थॉमस ऑक्सली यांनी ही माहिती ट्वीटवर दिली आहे.

हेही वाचा

Back to top button